Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“बंदूक हाती असणार्‍यांचा मुकाबला सोपा, पण जे विचारांनी पोखरताहेत, त्यांच्याशी मुकाबला कठीण!”

अर्बन नक्षलवादाचे षडयंत्र समजून घेण्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Fadnavis on Amravati violence and urban Naxalism 3-12-21

मुक्तपीठ टीम

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीच्या सोहळा मुंबई येथे पार पडला.या सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. तसेच त्यांनी यावेळी डाव्यांची विषवल्ली पुस्तकाचे प्रकाशनही केले. दरम्यान यावेळी त्यांनी ‘बंदूक हाती असणार्‍यांचा मुकाबला करणे सोपे आहे. पण, जे येणार्‍या पिढ्यांना विचारांनी पोखरताहेत, त्यांच्याशी मुकाबला कठीण आहे आणि त्यामुळेच अर्बन नक्षलवादाचे षडयंत्र समजून घ्यावे लागेल. अमरावतीत झालेला प्रकार तर सर्वांनीच पाहिला. तो संयोग नव्हे तर प्रयोग होता’, असा गंभीर आरोप केला.ज्येष्ठ विचारवंत सु. ग. शेवडे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील जी, रवींद्र चव्हाण आणि इतरही या सोहळ्याला उपस्थित होते.

 

बंदूक हाती असणार्‍यांचा मुकाबला करणे सोपे आहे. पण, जे येणार्‍या पिढ्यांना विचारांनी पोखरताहेत, त्यांच्याशी मुकाबला कठीण आहे आणि त्यामुळेच अर्बन नक्षलवादाचे षडयंत्र समजून घ्यावे लागेल. अमरावतीत झालेला प्रकार तर सर्वांनीच पाहिला. तो संयोग नव्हे तर प्रयोग होता.#naxalism pic.twitter.com/nORx2S8z37

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 2, 2021

जे आमच्या मुलांची डोकी पोखरतात त्यांना शोधून काढणं कठीण

  • मोठमोठ्या शहरात विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये विचारवंतांचा बुरखा घालून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रविरोधी भावना निर्माण करुन अराजकता निर्माण करायची असा अर्बन नक्षलवाद सुरु झाला.
  • हे चेहरे ओळखायला वेळ लागला.
  • कुणी प्राध्यापक, कुणी विचारवंत, कुणी पत्रकार असे बुरखे घातले गेले होते.
  • भीमा-कोरेगाव दंगलीनंतर आमच्या पोलिसांनी त्यांचे बुरखे फाडले.
  • त्यावेळी त्यांच्याकडे जे साहित्य सापडलं त्यात संपूर्ण भारत पोखरुन काढण्याची स्ट्रॅटेजी सापडली.
  • यांना चीन, पाकिस्तान आयएसआयकडून फंडिंग होतं.
  • जे बंदुका घेऊन जातात त्यांना बंदुकीनं मारणं सोपं आहे.
  • पण जे आमच्या मुलांची डोकी पोखरतात त्यांना शोधून काढणं कठीण आहे.

 

विकासाच्या आधारावर सरकारशी लढता येत नाही, मा. नरेंद्र मोदीजींना कुठल्याही कारणाने बदनाम करता येत नाही, हे लक्षात आल्याने असे विविध प्रयोग देशभर सुरू आहेत. राष्ट्रीय बाणा जागा ठेवायचा असेल तर तुम्हा-आम्हा सर्वांना अधिक जागरुक व्हावे लागेल.#Nationalism @narendramodi pic.twitter.com/avGKvJsEyO

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 2, 2021

 

ज्या गोष्टी झाल्याच नाहीत त्या पसरवल्या गेल्या

  • अमरावतीत मोठा हिंसाचार झाला.
  • त्रिपुरात ज्या गोष्टी झाल्याच नाहीत त्या पसरवल्या गेल्या.
  • त्रिपुरात सीपीआयच्या इमारतीला आग लागली, त्याचा फोटो मशिदीच्या नावाने व्हायरल केला गेला.
  • दिल्लीत पुस्तकं जाळती तर त्याचे फोटो कुराण जाळलं म्हणून व्हायरल केले गेले.
  • यांची इकोस्टिस्टिम आहे.
  • एकाने ट्विट केलं की दुसऱ्याने करायचं, अशा पद्धतीने अल्पसंख्यांकांवर कसे अत्याचार होत आहेत याचं नरेटिव्ह तयार केला.

 

हे उदारमतवादी नव्हे तर उधारमतवादी

  • काहीही संबंध नसताना महाराष्ट्रात ५०-५० हजाराचे मोर्चे निघाले.
  • वाटेत हिंदूंची दुकानं तोडली, जाळली.
  • दुसऱ्या दिवशी ज्यांची दुकानं जाळली ते रस्त्यावर आले की पोलिसांनी कारवाई करायची.
  • पण आदल्या दिवशीची घटना जिलीट करुन टाकायची असा प्रयोग सुरु आहे.
  • मोदी सरकार हटवता येत नाही त्यावेळी अशा पद्धतीने मुठभर विचारवंत अराजक निर्माण करतात.
  • असे प्रयोग संपवावेच लागतील.
  • हे उदारमतवादी नव्हे तर उधारमतवादी आहेत.

 

…त्यावेळी अर्बन नक्षलवाद उदयाला आला

  • डावी विषवल्ली डोक्यात विष पेरुन आपलं वाईट आणि इतर विचार चांगले हे भाव तयार करत आहेत.
  • अशा परिस्थितीत सच्चिदानंद शेवडे राष्ट्रवादी विचार मांडतात.
  • मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून डावी विषवल्ली आपल्याला कशी पोखरते हे पाहण्याची दुर्दैवी संधी मला मिळाली आहे.
  • आदिवासींच्या माध्यमातून नक्षलवादी विचार मांडण्याचा विचार व्हायचा.
  • पोलिसांनी त्यांचा नायनाट सुरु केला.
  • त्यावेळी नक्षलवाद कमी होऊन फक्त वसुलीपुरता उरला.
  • त्यावेळी डाव्यांच्या लक्षात आलं की आदिवासींना आता फार काळ वापरता येणार नाही.
  • त्यावेळी अर्बन नक्षलवाद उदयाला आला आहे.

Tags: Amravati violencedevendra fadanvisurban Naxalismअमरावतीअर्बन नक्षलवाददेवेंद्र फडणवीस
Previous Post

राज्यपालांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी ‘वंदे किसान ॲप’चे लोकार्पण

Next Post

महाराष्ट्रातील परस्परविरोधींच्या महाआघाडीसारखा भाजपाविरोधी प्रयोग देशातही! शरद पवारांचे प्रयत्न!

Next Post
ncp

महाराष्ट्रातील परस्परविरोधींच्या महाआघाडीसारखा भाजपाविरोधी प्रयोग देशातही! शरद पवारांचे प्रयत्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!