मुक्तपीठ टीम
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा काही विधाने करतात आणि त्यावरून मोठा वाद निर्माण होतो. आज पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले. भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानाचा राज्यभरातून निषेध होत आहे.
काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?
- औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापाठीच्या पदवी प्रदान कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते.
- राज्यपाल कोश्यारी म्हणाले, की मला राज्यात आल्यावर दोनदा गडकरी आणि पवार यांना पदवी देण्याचे भाग्य लाभले.
- शरद पवार हे राग आला तरी साखरेपेक्षा अधिक गोड असतात. ध्येय असणारे नेते आहेत.
- गडकरी यांना तर रोडकरी देखील म्हणतात.
- तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही.
- इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.
- शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय.
- डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला ते इथेच मिळतील.
राज्यपालांचे याआधीचीही विधानं वादाच्या भोवऱ्यात!!
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ६२व्या दीक्षांत समारंभामध्ये राज्यपाल बोलत होते.
- आज औरंगाबाद येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली.
- भगतसिंग कोश्यारी यांच्या या विधानाचा राज्यभरातून निषेध होत आहे.
- महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची ही काही पहिलीच वेळ नाही.