मुक्तपीठ टीम
स्टार्ट अप म्हणजे भारतातील कौशल्याला, नवकल्पनांना त्यांच्या कक्षा रुंदावण्याची संधी. अनेक तरुणांनी याचा लाभ घेत नवी व्यवसाय भरारी घेतली आहे. आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून आता राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार सुरु करण्यात येत आहेत. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने तिसऱ्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार योजनेची सुरुवात केली आहे आणि त्यासाठी अर्ज मागविले आहेत. प्रत्येक वर्गातील विजेत्यांना पाच लाखांचे तर विजेत्या इनक्यूबेटरला आणि विजेत्या एक्सीलरेटरला १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. १५ मार्च २०२२ पर्यंत राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२२ साठी अर्ज करता येतील.
याआधी दोन वर्षांच्या पुरस्कारांच्या यशस्वी आयोजनानंतर राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२२ साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ५० उप-क्षेत्रांमध्ये हे वर्गीकृत केले असून १७ क्षेत्रांमधील स्टार्टअपसाठी हे पुरस्कार दिले जातील. यात कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, पिण्याचे पाणी, शिक्षण आणि कौशल्य विकास, ऊर्जा, उद्योग तंत्रज्ञान, पर्यावरण, फिनटेक, अन्न प्रक्रिया, आरोग्य आणि निरामय जीवन, उद्योग ४.०, माध्यम आणि मनोरंजन, सुरक्षा, अंतराळ, वाहतूक आणि प्रवास यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, सात विशेष श्रेणी स्टार्टअपसाठी देखील आहेत
- महिलांनी सुरू केलेले स्टार्टअप
- ग्रामीण भागात प्रभाव करणारे
- कॅम्पस स्टार्टअप
- उत्पादन सर्वोत्कृष्टता
- महामारीशी लढा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करणारे (प्रतिबंधक, निदान, उपचारात्मक, देखरेख, डिजिटल कनेक्ट, घरून काम करण्यासाठी) स्टार्टअप
- तोडगा देऊ करणारे, भारतीय भाषांमध्ये कार्यालयीन व्यवस्था कार्यरत करणारे स्टार्टअप
- ईशान्येकडील स्टार्ट अप्स
स्टार्टअपची मजबूत यंत्रणा उभी करण्यासाठी महत्वाचा भाग कारणीभूत ठरणाऱ्या असामान्य इनक्यूबेटरला आणि एक्सीलरेटर्सला देखील नॅशनल स्टार्टअप पुरस्कार २०२२ देण्यात येईल.
प्रत्येक विजयी स्टार्टअपला ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. विजेते आणि उपविजेते-अप यांना देखील आपला संभाव्य प्रायोगिक प्रकल्प सादर करण्यासाठी, तसेच आपला उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची संधी मिळेल.
विजेत्या इनक्यूबेटरला आणि विजेत्या एक्सीलरेटरला १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. १५ मार्च २०२२ पर्यंत राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२२ साठी अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी www.startupindia.gov.in/content/sih/en/nsa2022.html या संकेतस्थळाला भेट द्या.