मुक्तपीठ टीम
गुगल नेहमीच आपल्या नव-नवीन लूकमध्ये आपल्याला दिसत असतो. मात्र आज बदललेला गुगलचा लोगो हा सर्वांना गोंधळून टाकणारा आहे. रंगेबीरंगी असणारा गुगलचा लोगो आज फिकट राखाडी रंगात दिसत आहे. कोणतेही डूडल नाही आणि त्यावर क्लिक केले जाऊ शकत नाही. सर्च इंजिन गुगलनेही राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दिवंगत राणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी गुगलने लोगो बदलला आहे.
गुगलने आपला लोगो का बदलला?
- राणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी Google ने आपल्या लोगोचा रंग बदलला आहे.
- ८ सप्टेंबर २०२२ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले.
- त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज, ११ सप्टेंबर रोजी देशभरात राजकीय शोक व्यक्त केला जात आहे.
- भारतात सर्व सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला आहे.
- सर्च इंजिन गुगलनेही राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
- दिवंगत राणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी गुगलने लोगो बदलला आहे.
सुंदर पिचाई यांनीही ट्विट केले!!
- गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिले की – “महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाने ब्रिटन आणि जगभरातील लोकांप्रती आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो.”
- गुगल सामान्यतः अमेरिकेत स्मृती दिनासारख्या उदास प्रसंगांना चिन्हांकित करण्यासाठी राखाडी लोगो वापरते, ज्यावर अमेरिकन लोक सैन्यात सेवा करताना आपले प्राण गमावलेल्या लोकांसाठी शोक व्यक्त करतात.
- २०१८ मध्ये, माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज HW बुश यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी गुगलने लोगो राखाडी केला होता.