मुक्तपीठ टीम
गुगल मॅप म्हटलं तर प्रवासात रस्ता शोधण्याची काळजी नसते. ही सेवा फक्त काही सेकंदात आपला डेस्टिनेशन शोधून देते. कोणत्याही ठिकाणी कोणती वाहतूक पद्धत उपलब्ध आहे तसेच त्या पद्धतींसह येणारे तपशील पुरवले जातात. गुगल मॅपमुळे नव्या ठिकाणी हरवण्याची भीती नाही. गुगल मॅपने योग्यरीत्या काम करण्यासाठी वेगवान इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. पण तुमच्याकडे इंटरनेट नसतानाही तुम्ही ते वापरू शकता. इंटरनेटशिवाय गुगल मॅप वाकसं परू शकता, ते जाणून घेऊया…
इंटरनेटशिवाय गुगल मॅप कसे वापरायचे?
- सर्वप्रथम डेस्टिनेशन प्लेस सेव्ह करा
- नंतर तुम्ही ते ऑफलाइन देखील वापरू शकता
- मग ते ऑनलाइनप्रमाणेच कार्य करते.
वाय-फाय द्वारे अपडेट करा गुगल मॅपचा नवीन फिचर
- इंटरनल मेमरीमध्ये ऑफलाइन मॅप डाउनलोड करा
- ऑफलाइन मॅप फक्त १५ दिवसांसाठी सेव्ह करू शकता.
- १५ दिवसांनंतर ते पुन्हा डाउनलोड करावे लागेल.
- गुगल देखील तुमचे मॅप आपोआप अपडेट करते.
- सेव्ह केलेले डेस्टिनेशन वाय-फाय द्वारे देखील अपडेट केले जाते.
- मॅप डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेट कनेक्शन कमी झाल्यास किंवा इंटरनेट कनेक्शन नसतानाही गुगल मॅपचा वापर आरामात करता येतो.
अँड्रॉइड फोनवर गुगल मॅप ऑफलाइन कसे वापरावे
- सर्वप्रथम अँड्रॉइड फोनवर गुगल मॅप उघडा
- इंटरनेटशी कनेक्ट असल्याचे आणि गुगल मॅपमध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा
- जायचे शहर किंवा ठिकाण शोधा
- ठिकाणाचे नाव किंवा पत्ता टाइप करा
- त्यानंतर वर दिलेल्या मोर पर्यायावर क्लिक करा
- आता शोधलेल्या ठिकाणाचा मॅप ऑफलाइन डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
- असे केल्याने तुम्ही तुमचे डेस्टिनेशन १५ दिवसांसाठी डाउनलोड आणि स्टोअर करू शकता.
iPhone/iPad वर गुगल मॅप ऑफलाइन कसे वापरावे
- सर्वप्रथम आयफोन किंवा आयपॅडवर गुगल मॅप उघडा
- इंटरनेटशी कनेक्ट असल्याचे आणि गुगल मॅपमध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा
- तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे ते शोधा
- खाली दिलेल्या ठिकाणाचे नाव किंवा पत्ता टाइप करा
- त्यानंतर वर दिलेल्या मोर पर्यायावर क्लिक करा
- येथे मॅप ऑफलाइन डाउनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध असेल, तो निवडा आणि वापरा.