मुक्तपीठ टीम
गुगल ही जगातील सर्वात मोठी टेक कंपनी आहे. अलीकडेच, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचा प्रवास आणि मनोरंजन खर्च कमी केला आहे. यावर कर्मचाऱ्यांनी सीईओ सुंदर पिचाई यांच्याकडे स्पष्टीकरणही मागितले. या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना सुंदर पिचाई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, पैसा आणि मौजमजा हेच सर्व काही नसते आणि मंदीमुळे आणि कंपनीने दिलेल्या फायद्यांमध्ये कपात केल्याने कर्मचाऱ्यांनी अस्वस्थ न होता कामात आनंद मानावा.
का केली कपात?
- गुगल गेल्या काही काळापासून तोट्यात आहे. या कारणास्तव, कंपनीला आपल्या कर्मचार्यांच्या प्रवास आणि मनोरंजनावर होणारा खर्च कमी करावा लागला.
- यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अनेक प्रकारे प्रश्न उपस्थित केले. . यावर सुंदर पिचाई रागाने म्हणाले, भत्ता आणि पैसा हे सर्व काही नाही.
- कर्मचार्यांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि कामात आनंद शोधला पाहिजे.
- कंपनीने उचललेली ही पावले कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी उचलली असून अशा गोष्टींमुळे कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही.
‘काहीही झाले तरी आमचे लक्ष कंपनीच्या यशाकडेच असेल’- सुंदर पिचाई
- गुगल दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई करू शकले आणि त्यानंतर कंपनीने उचललेली पावले याचाच परिणाम आहे.
- कंपनीने घेतलेल्या अशा निर्णयामुळे संतप्त होऊन अनेक कर्मचाऱ्यांनीही कंपनी सोडली आहे.
- सुंदर पिचाई पुढे म्हणाले की, ही एक मेहनती कंपनी आहे आणि आमच्यासोबत काम करण्यांनी पैशाची चिंता केली नाही पाहिजे.
- ते पुढे म्हणाले की, जेव्हा आमची कंपनी एवढी मोठी नव्हती आणि आमच्यासोबत फारसे लोक नव्हते, तेव्हाही आम्ही आनंदाने काम करायचो.
- सध्या आमच्या टीममध्ये पुरेसे सदस्य आहेत आणि टीममध्ये २० किंवा १०० लोक असले तरी आमचे लक्ष कंपनीच्या यशाकडेच असेल.