मुक्तपीठ टीम
आजवर आपल्या दर्जेदार सेवेच्या बळावर मोठ्या बलाढ्य कंपन्यांशी टक्कर देणारी एअरटेल आता स्मार्टफोनची निर्मितीही करणार आहे. गुगलसोबत एअरटेल 5G स्मार्टफोन प्रकल्पावर काम करणार आहे. त्यामुळे गुगलचे अत्याधुनिक तंत्रज्ञान परवडणाऱ्या किंमतीत भारतीय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. गुगल आपल्या गुगल फॉर इंडिटायजेशन फंडच्या माध्यमातून १०० कोटी डॉलर्स वापरणार आहे. भारती एअरटेलसोबत सहभागी होणार आहे. दोन्ही कंपन्या भारतात नवा 5G स्मार्टफोन विकसित कऱणार आहेत.
एअरटेल-गुगलचे संयुक्त प्रयत्न
- एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी याविषयी माहिती दिली.
- एअरटेल आणि गुगल नाविण्यपूर्ण उत्पादनांद्वारे भारताची डिजिटल इकोसिस्टम वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
- भारताच्या डिजिटल इकोसिस्टमचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
- या व्यवसायिक कराराचा एक भाग म्हणून, एअरटेल आणि गुगल भारतीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एअरटेलचा अँड्रॉइड स्मार्टफोन विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील.
- दोन्ही कंपन्या एकत्रितपणे स्मार्टफोन उत्पादकांसोबत भागिदारी करून देशात स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करतील.
5G नेटवर्क आणि क्लाऊड सोल्यूशन्सवरही लक्ष
- एअरटेल आणि गुगल या दोन कंपन्या एकत्र काम करत भारताच्या गरजा पूर्ण करणाऱ्या डिजिटल सोल्यूशनमध्ये गुंतवणूक करणार आहेत.
- याशिवाय दोन्ही कंपन्या भारताच्या स्थानिक परिस्थितीनुसार ५जी नेटवर्कवर एकत्र काम करतील.
- तसेच दोन्ही कंपन्या मिळून देशातील व्यवसायासाठी क्लाउड इकोसिस्टमला प्रोत्साहन देतील.
गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाईंना एअरटेल भागिदारीबद्दल अभिमान!
- भारताचे डिजिटल भविष्य घडवण्यात एअरटेल आघाडीवर आहे आणि जास्तीत जास्त भारतीयांपर्यत इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी एअरटेलसोबत भागिदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे.
- एअरटेल मधील आमची व्यवसायिक आणि बरोबरची गुंतवणूक स्मार्टफोन अॅक्सेस वाढवण्यासाठी नवीन व्यवसाय मॉडेलला सपोर्ट करण्यासाठी आणि कंपन्याना त्यांच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रवासात मदत करण्यासाठी आमच्या गुगल फॉर इंडिया डिजिटायजेशन फंडाशी सुसंगत आहे.
- एअरटेल भारतातील ५जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे आणि आता ते भारतातील ग्राहकांना नवीनतम तंत्रज्ञान देण्यासाठी इंडेल,सिस्को,नोकिया,क्वालकॉम,एरिक्सन,टीसीएस आणि गुगल सारख्या टेक कंपन्यांसोबत काम करत आहे.
- शिवाय भारती एअरटेल,देशातील आघाडीची दुरसंचार कंपनी म्हणून भारतीय ग्राहकांना किफायतशिर किंमतीत नवीनतम तंत्रज्ञान आणि गॅझेट्स प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.
- यामुळेच एअरटेल ने जगभरातील आघाडीच्या टेक कंपन्यांच्या सहकार्याने भारतात ५जी तंत्रज्ञानाची चाचणी सुरू केली आहे.