Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिडकोच्या ५,७३० घरांच्या गृहनिर्माण योजनेला उत्तम प्रतिसाद; आतापर्यंत १० हजार नागरिकांनी केली अर्ज नोंदणी

तळोजा नोड वास्तव्यासाठी उत्तम पर्याय असल्याचे झाले सिद्ध

February 5, 2022
in सरकारी बातम्या
0
CIDCO HOUSIG SCHEME 2022

मुक्तपीठ टीम

परवडणाऱ्या दरातील घरे, कनेक्टिव्हिटी आणि अन्य पायाभूत सोयी सुविधांमुळे नवी मुंबईमध्ये वास्तव्य करण्यासाठी तळोजा नोड हा सर्वसामान्य नागरिकांकरिता उत्तम पर्याय ठरत आहे. सिडकोच्या बहुतांशी गृहनिर्माण योजनांमधील गृहसंकुले तळोजा नोडमध्ये साकारण्यात आली आहेत. सिडकोने नुकत्याच आणलेल्या गृहनिर्माण योजने अंतर्गत तळोजा नोडमधील ५,७३० परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेला उत्तम प्रतिसाद लाभत असून आत्तापर्यंत १० हजार नागरिकांनी या गृहनिर्माण योजनेत अर्ज नोंदणी केली आहे.

 

 

तळोजा हा नवी मुंबईतील वेगाने विकसित होणाऱ्या नोडपैकी एक आहे. तळोजा नोड नवी मुंबईतील वेगाने विकसित होणार नोड आहे. मुंबई-पुणे महामार्ग, रेल्वे आणि सिडकोचा मेट्रो प्रकल्प, यांमुळे या नोडला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. मेट्रोचे आगार तळोजा येथे असून मेट्रो मार्गेही हा नोड सीबीडी बेलापूरला जोडला जाणार आहे. या नोडमधील काही क्षेत्र हे शाळा, पदवी महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, रुग्णालये, समाजकेंद्रे, वसतिगृहे इ. सामाजिक उद्देशांकरिता राखीव आहे. मेट्रो रेल्वेच्या स्थानकांलगत वाणिज्यिक उपक्रमांकरिता काही क्षेत्र हे सिडकोकडून निश्चित करण्यात आले आहे. यामुळे तळोजा नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर वाणिज्यिक संधी निर्माण होणार आहेत. परवडणाऱ्या दरातील घरे, कनेक्टिव्हिटी, रोजगार, वाणिज्यिक प्रकल्प यांमुळे तळोजा नोड हा नवी मुंबईतील वास्तव्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.

 

सिडको आपल्या गृहनिर्माण योजनांद्वारे सातत्याने सर्वसामान्य नागरिकांकरिता नवी मुंबईमध्ये परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देत असते. सिडकोच्या बहुतांशी गृहनिर्माण योजनांमधील संकुले ही तळोजा नोडमध्येही साकारण्यात आली आहेत. सिडकोकडून २६ जानेवारी २०२२ रोजी ५,७३० घरांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजने अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या ५,७३० घरांपैकी १,५२४ घरे ही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि उर्वरित ४,२०६ घरे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. या योजनेकरिता २४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना तळोजा नोडमध्ये आपले हक्काचे घर घेण्याची व नवी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरामध्ये वास्तव्य करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.


Tags: CIDCOHousing SchemeTalojeगृहनिर्माण योजनातळोजासिडको
Previous Post

पत्रकार नंदू धुरंधर दिग्दर्शित ‘गामा फाउंडेशन फिल्म्स’च्या “पँनडेमिक – द ब्राईट साईड” चा ‘चलचित्र रोलिंग अवॉर्ड – बंगलोर’ आणि ‘आयकॉनिक शॉर्ट सिने अवॉर्ड’ने गौरव!

Next Post

उत्तरप्रदेश निवडणूक २०२२: निकाल बदलू शकणारे दलित मतदार यावेळी काय करणार?

Next Post
UP Election (2)

उत्तरप्रदेश निवडणूक २०२२: निकाल बदलू शकणारे दलित मतदार यावेळी काय करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!