Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंचा मोठा चमू, ‘चियर फॉर इंडिया’ला मोठा प्रतिसाद

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Cheer for india

मुक्तपीठ टीम

जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिंपिकमध्ये यंदा भारतीय खेळाडूंचा मोठा चमू सामील झाला आहे. भारतातून प्रथमच ११९ इतका मोठा खेळाडूंचा गट या जागतिक स्पर्धेत उतरला आहे. या सर्व खेळाडूंपर्यन्त भारतीय जनमानसातून भरघोस शुभेच्छा पोहचाव्यात यासाठी प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र – गोवा), पुणे तसेच, या विभागांतर्गत काम करणार्‍या ११ क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोंनी ‘चियर फॉर इंडिया’ मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

 Olympics

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीनं #cheer4indiaचे फोटो स्टँडी महाराष्ट्र व गोव्यात उभे केले होते. अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, वर्धा, नागपूर, सोलापूर, पणजी अशा सर्व ठिकाणी या उपक्रमाला लोकांनी भरपूर प्रतिसाद देत फोटो काढले.

 Olympics

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, अहमदनगर यांनी यानिमित्ताने शुभेच्छा स्वाक्षरी मोहिम राबविली.

 Olympics

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, अमरावतीने ‘करिअरमध्ये खेळाचे महत्व’ या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते. योगायोग असा की यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या डॉ. सुरेश देशपांडे यांच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील मल्लखांबपटूंची यंदाच्या ऑलिंपिकमध्ये कौशल्य सादरीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. सुमारे ८५ वर्षांनंतर भारतीय मल्लखांबाचे प्रात्यक्षिक जागतिक स्तरावरच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये होत आहे.

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद व नागपूरने सायकल फेरीचे आयोजन केले होते. याला अनेक सायकल पटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, नांदेडने क्रीडा अकादमीच्या सहयोगाने धावफेरीचे आयोजन केले होते. यावेळी संपूर्ण स्टेडीयम cheer4indiaच्या घोषणांनी दुमदुमून गेले.

 Olympics

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, नाशिक यांनी देखील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.

 Olympics

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, पणजी, गोवा कार्यालयाने 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. ऑलिंपिक असोसिएशन, गोवा यांच्या सहयोगाने ऑलिंपिक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होणार आहे; त्या ठिकाणी फोटो स्टँडी उभारण्यात आली आहे. गोव्याचे क्रीडा मंत्री मनोहर (बाबू) अजगावकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 Olympics

प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणेने ऑलिंपिक खेळाडूंना शुभेच्छा म्हणून नागरिकांना डिजिटली किंवा हाताने रेखाटलेले भित्तिचित्र (पोस्टर) आणि घोषवाक्य (स्लोगन) तयार करण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ३० जुलै पर्यन्त स्पर्धक आपली कला सादर करू शकतात.

 Olympics

याशिवाय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यातील गीत व नाटक विभागाशी संबंधीत अधिकारी वर्गाने एका गाण्याची निर्मिती केली आहे.


Tags: cheer4indiakiran rijijuTokyo Olympicsचियर फॉर इंडियाटोकियो
Previous Post

पत्रकार कपिल देशपांडे आता ‘लेट्स अप’सोबत डिजिटल क्षेत्रात!

Next Post

नव्या ब्रिथ अॅनालायझर उपकरणाद्वारे आता सहज करता येणार कोरोना चाचणी!

Next Post
Breath Analyzer

नव्या ब्रिथ अॅनालायझर उपकरणाद्वारे आता सहज करता येणार कोरोना चाचणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!