Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टीसींंची जबरदस्त कामगिरी…मध्य रेल्वेला  १९३ कोटी ६२ लाख रुपयांचा महसूल!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
central Railway

मुक्तपीठ टीम

लाखो रेल्वे प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून प्रवेश करण्यापूर्वी तिकिट खरेदी न करणाऱ्या हजारो फुकट्या प्रवाशांमुळेच मध्य रेल्वेच्या तिजोरीत १९३ कोटी ६२ लाख रुपयांचा दंडात्मक स्वरुपातील महसूल जमा झाला आहे. यामध्ये मुंबई विभागातील ४ आणि अन्य ३ विभागांतील तपासनीसांनीही कर्तव्य बजावल्यामुळे कोट्यवधींचा महसूल मिळाला. अशा विनातिकीट/अनियमित प्रवासातून मिळालेला १९३ कोटी ६२ लाख रुपयांचा महसूल एप्रिल-आॅक्टोबर २०२२ या कालावधीत नोंदवला गेला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ९३.२९ कोटींची नोंद झाली होती. त्यात १०७.५४% ची वाढ झाली आहे.
विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करते. विनातिकीट प्रवास आणि अशा इतर अनियमिततेमुळे होणा-या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
एप्रिल-आॅक्टोबर २०२२ दरम्यान, विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण २९.०३ लाख प्रकरणे आढळली. गतवर्षीच्या याच कालावधीत १६.१६ लाख प्रकरणे होती. यामध्ये ७९.४६% ची वाढ दिसून येत आहे. आॅक्टोबर २०२२ या महिन्यात,  विनातिकीट/अनियमित प्रवासाच्या व बुक न केलेल्या सामानासह ४.४४ लाख  प्रकरणांद्वारे मध्य रेल्वेने ३०.३५ कोटींचा महसूल नोंदविला. याकरीता मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने विनातिकीट आळा घालण्यासाठी बरेच प्रयत्न केले.

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात तिकीट तपासणी कर्मचा-यांपैकी चार जणांनी एक कोटी रुपयांहून अधिक महसूल गोळा करून उत्कृष्ट कामगिरी दाखवली. मुंबई मुख्यालयतील डी. कुमार (टीटीआय) यांनी १५.०५३ प्रकरणांमधून १.४३ कोटी रु, मुख्यालयातील एस. बी. गलांडे  यांनी १४,८३७ प्रकरणांमधून  १३.४ कोटी रु, टीटीआय एच. ए. वाघ (मुख्यालय)  यांनी ११,६३४ प्रकरणांमधून  १.०४ कोटी रु, श्री टीटीआय, मुंबई विभागातील सुनील डी. नैनानी यांनीही  १२,१३७ प्रकरणांमधून १.०३ कोटी रुपये महसूल मिळवून दिला.

भुसावळ विभागातील मुख्य तिकीट परीक्षक के.के.पटेल यांनी ११,३३६ प्रकरणांमधून ९९.२३ लाख रुपये, याच विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक विनय ओझा यांनी ११,८१८ प्रकरणांमधून ९३.५४ लाख रु. आणि पुणे विभागातील एकमेव मुख्य  तिकीट निरीक्षक एस.एस. क्षीरसागर यांनीदेखील मुख्य तिकीट तब्बल ९,६२३ प्रकरणांमधून ९१.४४ लाख रुपयांचा महसूल मध्य रेल्वेच्या कोषागारात जमा केला.

Tags: Central RailwayCentral Railway TCGood performance of Central Railway TCsmuktpeethRailway Passengerघडलं-बिघडलंमध्य रेल्वेमध्य रेल्वे टीसीमध्य रेल्वे टीसींंची चांगली कामगिरीमुक्तपीठरेल्वे प्रवाशी
Previous Post

आदित्य ठाकरेंविरुद्ध तेजस्वी सूर्या! आक्रस्ताळ्या रणनीतीचा शिवसेना कसा सामना करणार?

Next Post

सरस फूड फेस्टीवलमध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना खवय्यांची पसंती

Next Post
Saras Food Festival

सरस फूड फेस्टीवलमध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना खवय्यांची पसंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!