Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरस फूड फेस्टीवलमध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना खवय्यांची पसंती

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Saras Food Festival

मुक्तपीठ टीम

नवी दिल्लीतील सरस फूड फेस्टीवलमध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना खवय्यांनी पसंती दिली असून दिल्लीकर खवय्ये वडापाव, मिसळपाव, आगरी मटण तसेच चिकन आणि पुरण पोळीचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत.

बाबा खडक सिंग मार्गस्थित एम्पोरियम भवन परिसरात सरस फूड फेस्टीवल २०२२चे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये १७ राज्यांची २१ खाद्य पदार्थांची दालने आहेत. बचत गटांच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या पक्वांनांना येथे मांडण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्राची दोन दालने आहेत. एक नंदूरबार आणि दूसरे ठाण्यातील आहे

राजधानीत सध्या थंडीची चाहुल लागली आहे. अशा वातावरणामध्ये या परिसरात सर्वत्र राज्या-राज्यातील देसी खाद्य पदार्थांचा खमंग सुहास दरवळतो आहे. हिमाचल प्रदेश ते केरळपर्यंतचे खवय्यांना आवडणारे शाकाहारीसह मांसाहारी पदार्थ ताजे वाढले जात आहेत.

यात महाराष्ट्राचा वडापाव, दाबेली, मिसळपाव, तोंडाला पाणी सोडतात तर पुरण पोळीने जिभेवर एक वेगळेच समाधान मिळत असल्याचे येथे दिसून आले. हे अधिक खाल्ले जाणारे पदार्थ ‘दशमा’ महिला बचत गट, नंदूरबार येथील आहेत. तर कोल्हापूर मटण नुसत ऐकूण असणारे खवय्ये डोळयात पाणी आणूनही खाण्यात दंग दिसले. यासह आगरी मटण, आगरी चिकण, कोळंबी रस्सा, भात, पोळी, तांदळाची भाकरी हे दिल्लीकरांसाठी नवीन असणारे पदार्थही खवय्ये चाखूण पाहत आहेत. हे दालन श्री कृपा बचत गट, ठाणे यांचे आहे.

प्रथमच देशाच्या राजधानीत स्टॉल्स लावण्याची संधी मिळाल्याने सुरूवातीला असणारी धाकधूक खवय्यांनी ‘और एक’ अशी फरमाईश करत दूर करून आत्मविश्वास वाढला. घरी जे पदार्थ सहज बनविले जातात तेच पदार्थ इतर राज्यातील लोकांपुढे मांडताना शेफ म्हणून टॅग लागतो तेव्हा मन सुखवून जाते अशी प्रतिक्रिया या बचत गटातील महिलांनी दिली.

या ठिकाणी खवय्यांनी खाद्यपदार्थांचा निवांत आस्वाद घ्यावा, यासाठी टोकन व्यवस्था केलेली आहे. स्टॉल्स आकर्षक आणि स्वच्छ आहेत. या ठिकाणी दररोज एक सांस्कृतिक कार्यक्रमही दाखविण्यात येतो. हे फूड फेस्टीवल 27 ऑक्टोबरपासून सुरू झाले असून ते 10 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत विनाशुल्क सर्वांसाठी खुले आहे.

 


Tags: delhigood newsMaharashtra FoodmuktpeethSaras Food Festivalघडलं-बिघडलंचांगली बातमीदिल्लीमहाराष्ट्र खाद्यपदार्थमुक्तपीठसरस फूड फेस्टीवल
Previous Post

टीसींंची जबरदस्त कामगिरी…मध्य रेल्वेला  १९३ कोटी ६२ लाख रुपयांचा महसूल!

Next Post

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या खर्चाने सिंधुदुर्गात दोन आरोग्य केंद्रामध्ये अत्याधुनिक हेल्थ केअर किट्स

Next Post
Guardian Minister Ravindra Chavan

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या खर्चाने सिंधुदुर्गात दोन आरोग्य केंद्रामध्ये अत्याधुनिक हेल्थ केअर किट्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!