Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पँथरच्या पुनरुज्जीवनासाठी मराठवाड्याचा पुन्हा पुढाकार

संपर्क समिती स्थापन; अॅड रमेशभाई खंडागळे निमंत्रक

March 11, 2022
in घडलं-बिघडलं
0
Dalit Panther And RameshBhau Khandagale

मुक्तपीठ टीम

१९७७ सालात राजा ढाले यांचा बरखास्तीचा निर्णय धुडकावून लावत दोनच महिन्यांत दलित पँथरला संजीवनी दिलेल्या मराठवाड्याने यंदा साजऱ्या होणाऱ्या पँथरच्या सुवर्ण महोत्सवात भारतीय दलित पँथरच्या पुनरुज्जीवनासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे.

 

पँथरचे मराठवाड्यातील अग्रणी अॅड रमेशभाई खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली आज क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत पँथर्सची एक बैठक झाली. खारघर येथील सत्याग्रह कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांतील पॅंथर्स सहभाग झाले होते.

 

या बैठकीत भारतीय दलित पँथरचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक संपर्क समिती स्थापन करण्यात आली. ही समिती पुढील दोन महिन्यांत मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या प्रदेशांचा दौरा करणार आहे. त्यातून राज्यभरातील पँथर्ससहित छोट्या मोठ्या सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी- तरुण यांच्याशी एकूणच मागास समूहांच्या ज्वलंत प्रश्नांवर संवाद साधण्यात येणार आहे.

 

या समितीमध्ये निमंत्रक : अॅड रमेशभाई खंडागळे, मुंबई: प्रा डॉ जी के डोंगरगावकर, आनंद कांबळे, ठाणे: प्राचार्य रमेश जाधव, प्रा एकनाथ जाधव, नवी मुंबई: प्रा महेंद्र सूर्यवंशी, औरंगाबाद: सुभाष ठोकळ, ऍड विजय जाधव, नांदेड: दशरथ लोहबंदे ( जिल्हा परिषद सदस्य), जालना: शिवाजी आदमाने, लातूर : संजय कांबळे, बुलडाणा: संतोष तायडे, निलेश वानखेडे, परभणी : राहुल मोगले, बीड: किसन तांगडे, उस्मानाबाद: विश्वनाथ तोडकर, नंदुरबार: रवी गोसावी यांचा समावेश आहे.

 

राज्यव्यापी दौऱ्यानंतर सर्व प्रदेश आणि जिल्ह्यातील पँथरच्या पुनरुज्जीवनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा संपर्क समितीमध्ये समावेश करण्यात येईल, असे रमेशभाई खंडागळे यांनी आजच्या बैठकीत जाहीर केले.

 

  • १९७० च्या दशकात देशभरात दलितांवर वाढलेल्या हिंसक अत्याचारांविरोधात तरुणांच्या संतापाच्या उद्रेकातून दलित पँथर जन्माला आली होती. आजची परिस्थिती त्याहून वेगळी आणि अधिक भयावह आहे. आता दलित नुसते असुरक्षित नाहीत, तर त्यांना सुरक्षिततेची हमी देणारे संविधान आणि लोकशाहीसुद्धा संकटात सापडली आहे.

 

Adv Ramesh bhai khamdagale

अॅड रमेशभाई खंडागळे

निमंत्रक, भारतीय दलित पँथर
पुनरुज्जीवन संपर्क समिती.
मो: 9545078631


Tags: Dalit PantherRameshBhai Khandagaleअॅड रमेशभाई खंडागळेदलित पँथर
Previous Post

#मुक्तपीठ LIVE महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधानसभा ११ मार्च २२ (१)

Next Post

“केंद्रीय यंत्रणा विरोधकांना ठरवूनच लक्ष्य करतात! त्यावर बोलणारच, भले मग घरी धाड पडो!!” – संजय राऊत

Next Post
Sanjay Raut (4)

"केंद्रीय यंत्रणा विरोधकांना ठरवूनच लक्ष्य करतात! त्यावर बोलणारच, भले मग घरी धाड पडो!!" - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!