मुक्तपीठ टीम
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु झाला आहे. या ७५ वर्षात देशात खूप काही बदल झाले आहेत. पण बदललं नाही ते सोन्याचं महत्व. मिरवण्याबरोबरच गुंतवणुकीसाठी सोनंच सर्वाधिक पसंतीचं राहिलं आहे. त्यामुळेच गेल्या ७५ वर्षात सोनं हे ५४१ पटीत महागलं आहे. याचा अर्थ स्वातंत्र्यापूर्वी एक रुपयाला घेतलेल्या सोन्याची आजची किंमत तब्बल ५४०० रुपये झाली आहे! तोळ्याच्या हिशेबात सांगायचं तर ८८ रुपये ६२ पैशांना घेतलेलं एक तोळं सोनं आता ४८ हजार रुपये किंमतीचं झालं आहे.
७५ वर्षांमध्ये सोन्याचा लखलखाट वाढला!
- स्वातंत्र्यापूर्वीच्या आजच्या सोन्याच्या किंमतीत भलामोठा बदल झाला आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ८८.६२ रुपये होती, जी आज ४८,००० च्यावर गेली आहे.
- तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या गुंतवणूकदारांनी इक्विटी, बॉण्ड्ससारख्या गुंतवणुकीच्या तुलनेत खूप चांगला नफा कमावला आहे.
- विशेषतः २००८ नंतर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
८८ रुपये ते ४८ हजार!
- भारतीयांसाठी सोने हा केवळ व्यावहारिक गुंतवणुकीचा नाही तर भावनात्मक गुंतवणीचाही विषय आहे.
- त्यामुळे स्वातंत्र्याच्या आधीपासूनच भारतीयांनी सोन्यात मोठी गुंतवणूक केली आहे.
- १९४७ मध्ये सोन्याची सरासरी किंमत ८८.६२ रुपये प्रति १० ग्रॅम होती.
- आज १० ग्रॅमसाठी ४८,००० च्या पुढे पैसे मोजावे लागत आहेत.
सोन्यावर प्रचंड परतावा!
- या काळात सोन्यावर सुमारे ५४५ पट परतावा मिळाला आहे.
- २००८ मध्ये मंदीच्या काळात लोकांना सोन्यात गुंतवणूक करणे हा सुरक्षित मार्ग असल्याचं लक्षात आलं.
- २००८ मध्ये सोन्याची किंमत १२,५०० रुपये प्रति १० ग्रॅम होती. परंतु यानंतर, जागतिक स्तरावर सोन्यातील गुंतवणूक वाढली, ज्यामुळे किमंती वाढल्या आणि आज किरकोळ सराफा बाजारात सोन्याची विक्री ४८,००० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पुढे होत आहे.
- गेल्या १३ वर्षात सोन्याच्या किंमतीत २७२ पटीने वाढ झाली आहे.
सोन्याची गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी फायद्याची!
सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, गुंतवणुकीचा कालावधी दीर्घ असावा. त्यामुळे जास्त चांगला फायदा मिळेल. त्यांच्या मते, जर तुम्ही सोन्यात ९ ते १० साठी गुंतवणूक केली तर तुम्हाला सोन्यावर १०% परतावा मिळेल असे समजा. या व्यतिरिक्त, त्यांनी सल्ला दिला की भौतिक सोन्याबरोबरच ईटीएफ, गोल्ड बाँड सारख्या पर्यायांचाही विचार केला पाहिजे.
पुढचे ५ वर्ष कसे असतील?
- तज्ज्ञांच्या मते भारतीय रुपयांमध्ये ७८ हजार ते १,३१,०० रुपयांच्या दरम्यान असू शकतात.
- आंतरराष्ट्रीय सुवर्ण तज्ज्ञ डिएगो पॅरिला यांनी २०१६ मध्ये भाकीत केले होते की, सोने ५ वर्षात त्याच्या विक्रमी पातळीवर असेल.
- आणि त्याचा अंदाज गेल्या वर्षी बरोबर ठरला, आता ७८ हजार ते १ लाख ३१ हजाराचा अंदाजही त्यांनीच वर्तवला आहे.
- मात्र, जर तिसरी लाट आली नाही, तर सोन्यात फारशी उलथापालथ अपेक्षित नाही.