मुक्तपीठ टीम
शालेय विद्यार्थ्याना शिक्षण छान, मजेदार वाटण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांबरोबर उत्साहाने काम करत जगभरातील ७० हून अधिक ठिकाणी गोदरेज समूहाच्या ३,००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी समूहाच्या ८व्या जागतिक स्वयंसेवा सप्ताहात भाग घेतला.
दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर होणाऱ्या या वर्षीच्या उपक्रमाचा उद्देश हा खेळ आणि मजेदार प्रयोगांद्वारे मूलभूत संकल्पनांचे प्रात्यक्षिक करू मुलांमध्ये शिकण्याची आवड आणि विज्ञानाबद्दल कुतूहल जागृत करणे हा होता.
उदाहरणार्थ, मुंबईत, गोदरेजने WOSCA च्या लाइफ–
लॅब सायन्स प्रोग्रामबरोबर भागीदारी केली आहे. मुलांसाठी शाळांमध्ये अनुभवात्मक शिक्षण मंचांची स्वयं–शाश्वत संस्कृती निर्माण करण्यासाठी विज्ञान शिक्षकांना सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यांनी एकत्रितपणे, लीप–फ्रॉग शिक्षण आणि मुलांची आत्मविश्वास पातळी वाढवण्यासाठी खेळ–आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करून वेगवेगळे उपक्रम आयोजित केले.
स्वयंसेवकांनी वस्तुमान, अंतर, ऊर्जा, गुरुत्वाकर्षण केंद्र, न्यूटनचे गतीचे नियम तसेच यांत्रिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचे मूलभूत सिद्धांत संकल्पनांचे प्रात्यक्षिक ‘बलून कार‘ प्रयोगाद्वारे दाखवले. प्रयोगांचा एक भाग म्हणून विद्यार्थी फुगवलेला फुगा बांधून एक प्राथमिक कार तयार करतात. फुग्यातून हवा सोडली जात असताना, ती कारला पुढे नेते. या प्रयोगातून पोटेनशीयल एनर्जीचे कशा प्रकारे कायनेटिक ऊर्जेत परिवर्तन होते आणि ही ऊर्जा कार पुढे ढकलते हे विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात येते. या उपक्रमात एकूण १३,००० हून अधिक मुले सहभागी झाली.
गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असोसिएट कंपन्यांच्या सीएसआर प्रमुख गायत्री दिवेचा म्हणाल्या, “आम्ही आमच्या टीम मधील सदस्यांना स्थानिक समुदायांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि विविध स्वयंसेवा उपक्रमांद्वारे त्यांच्या विकासात योगदान देण्याकरता नेहमीच प्रोत्साहित केले आहे. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर या वर्षी आम्ही परत प्रत्यक्ष स्वयंसेवन करायला येत असल्यामुळे हे वर्ष आणखी अर्थपूर्ण होते. दर वर्षागणिक हा कार्यक्रम अधिकाधिक चांगला बनवण्यात सातत्याने योगदान देणाऱ्या गोदरेज मधील सर्व सदस्यांचा मला अभिमान आहे. या वर्षीच्या स्वयंसेवा दिनाचा विषय विज्ञानाभोवती फिरणारा आहे. सखोल सांघिक संबंध विकसित करण्यासाठी विज्ञान हा एक उत्कृष्ट विषय आहे. नवीन पिढीमध्ये विज्ञानावर आधारित संस्कृती विकसित करण्याची आम्हाला आशा आहे.”
गोदरेज जागतिक स्वयंसेवक सप्ताह हा गोदरेजच्या वर्षभर चालणाऱ्या धर्मादाय स्वयंसेवन कार्यक्रमाचा विस्तार आहे. गोदरेजच्या सर्व व्यवसाय शाखांमध्ये कर्मचाऱ्यांना एकत्रितपणे स्वयंसेवा करण्यास प्रोत्साहित करून एका समान संकल्पनेवर सखोल टीम कनेक्ट आणि अधिक प्रभाव निर्माण करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे. २०१५ मध्ये सादर झाल्यापासून जगभरातील ५,००० हून अधिक गोदरेज कर्मचाऱ्यांनी त्यांचा वेळ आणि प्रयत्न या उपक्रमांना दिले आहेत. समाजाला परतफेड करण्याचा आणि आगामी पिढ्यांसाठी एक चांगले भविष्य निर्माण करण्याचा हा एक मार्ग आहे असा विचार यामागे आहे. स्वयंसेवक विविध उपक्रमांवर काम करतात. त्यात कौशल्य–आधारित, तरुण आणि प्रौढांना कार्यशक्तीसाठी तयार करणारे दीर्घकालीन स्वयंसेवन कार्य, दिवसभराचे कार्यक्रम आणि आवश्यक निधी उभारणी यांचा समावेश असतो.
बलून कार उपक्रमाची लिंक: https://www.youtube.com/