Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पॅरालिम्पिक पदक विजेत्यांना शानदार भेटी, भाविनाला एमजी कार, अवनीला महिंद्रा एसयूव्ही!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Paralympic medalists

मुक्तपीठ टीम

भारताला यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये आजवरचं सर्वात चांगलं यश मिळतंय. नेमबाजीत अवनी लेखारानं सुवर्णपदक मिळवलं. इतरही खेळाडू पदकांची कमाई करतायत. या खेळाडूंवर भेटींचा वर्षाव होऊ लागलाय. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अवनीला महिंद्राची खास एसयूव्ही भेट देणार असल्याचं जाहीर केलंय. तर एमजी मोटरने रौप्य पदक विजेत्या भाविना पटेलला नवीन कारने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. इतरही खेळाडूंना भेट आणि पुरस्कारांनी गौरवलं जात आहे.

 

अवनीला महिंद्रा एसयूव्ही नेमबाजीत अवनी लेखारा नावाची ही खेळाडू पॅरालिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी देशातील पहिली महिला ठरली आहे. तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग (एसएच१) स्पर्धेत पदक जिंकले. तिच्या या यशासाठी महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी तिला आणि इतर चॅम्पियनसाठी खास भेट जाहीर केली. आनंद यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, कंपनी शूटर अवनी लेखारासाठी “स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) समर्पित करेल.

 

भाविनाला एमजीची कार एमजी मोटरने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडू भाविना पटेलला नवीन कारने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी ही घोषणा केली. भारताच्या पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल ही भारतासाठी पॅरालिम्पिक पदक जिंकणारी पहिली टेबल टेनिस खेळाडू आहे.

अवनीसाठी महिंद्रांची एसयूव्ही

  • पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय असण्याबरोबरच अवनी लेखारा हिने २४९.६ गुणांसह नवीन पॅरालिम्पिक विक्रम प्रस्थापित करण्याचा मान मिळवला.
  • जयपूरमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय अवनीला २०१२ मध्ये एका कार अपघातात पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती.
  • पॅरालिम्पिक गेम्समध्ये हा एक नवीन विक्रम आहे. या विजयासह अवनीने युक्रेनच्या इरियाना शेटनिकच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी केली आहे.
  • अवनीला महिंद्राची एसयूव्ही गाडी भेट मिळणार आहे.

भाविनाला मिळणार कोणती कार?

  • भाविना पटेल यांना कोणती कार भेट देणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट केलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी एसयूव्ही एस्टर भाविनाला भेट देईल.
  • एमजी मोटर्स कार उत्पादक लवकरच भारतीय बाजारपेठांसाठी एस्टर नावाची नवीन एसयूव्ही बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
  • एमजी एस्टर एसयूव्ही, हेक्टर, हेक्टर प्लस, ग्लॉस्टर आणि झेडएस ईव्ही एसयूव्ही नंतर भारतातील चीनी मालकीच्या ब्रिटिश कार उत्पादकाकडून देशातील ही पाचवी कार असेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: mahindra and mahindraMG Motorअवनी लेखाराएमजी मोटर्सभाविना पटेल
Previous Post

गुजरातच्या केवडियामधील न्युट्रिशन पार्क सुपोषणासाठी देशभर बहरणार

Next Post

अॅपलची नवी झेप, कोणतंही नेटवर्क नसलं तरी चालणार नवा आयफोन १३

Next Post
Iphone

अॅपलची नवी झेप, कोणतंही नेटवर्क नसलं तरी चालणार नवा आयफोन १३

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!