मुक्तपीठ टीम
काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांची राजीनामा देण्याची मालिका सुरुच आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी देखील आज पक्षाला रामराम करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर ते भाजपात सामील होणार असल्याची देखील चर्चा होती. परंतु गुलाम नबी आझाद यांनी या सगळ्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. मी पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये येणार आहे. त्याचबरोबर मी माझा स्वत:चा पक्ष तयार करणार असल्याचे ते म्हणाले.
गुलाब नबी आझाद नवा पक्ष स्थापन करणार!!
- राजीनामा दिल्यानंतर आझाद हे भाजापमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती.
- पण त्यांनी स्पष्ट केलं आहे, की मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही.
- ते म्हणाले, गेल्या तीन वर्षापासून विरोधी पक्षातील काही लोकांनी मोकळ्यात आफवा उठवल्या होत्या की मी भाजपा मध्ये प्रवेश करणार आणि प्रवेश केल्या नंतर मला राष्ट्रपती किवा उपराष्ट्रपती बनावनार पण तस काही नाही मी कश्मिर मध्ये जाणार आणि नवा पक्ष काढणार आहे.
- आणि लवकरच आम्ही राष्ट्रीय स्थरावर दिसेल.
गुलाम नबी आझादांचं सोनिया गांधींना भावूक राजीनामा पत्र!!
- गुलाम नबी आझाद यांच्यापूर्वी ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. सध्या ते समाजवादी पक्षाकडून राज्यसभेचे खासदार आहेत.
- गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
- आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं राजीनामा पत्र पाठवलं आहे.
- सोनिया गांधींना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात गुलाम नबी आझाद यांनी लिहिलं आहे की, “अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचे माझं ५० वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसंच भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढावी, असा सल्लाही गुलाम नबी आझाद यांनी दिला आहे.