मुक्तपीठ टीम
भारतात काही दिवसांपूर्वीच धुमधडाक्यात 5G नेटवर्कचे आगमन झाले. भारतातील काही ठिकाणीच त्याची सेवा सुरू करण्यात आली आहे तर, इतर ठिकाणीही लवकरच ही सेवा सुरू करण्यात येईल. जिथे अनेक टेलिकॉम कंपन्या 5G सेवा सुरू करत आहेत त्याच वेळी, काही स्मार्टफोन कंपन्या 5G सक्षम स्मार्टफोन आणण्यासाठी देखील काम करत आहेत. आता अॅपलही त्यांच्या काही निवडक डिव्हाइसमध्ये 5G सुविधा देत आहे.
अॅपलने नुकतेच १३ डिसेंबर रोजी रात्री ११:३० वाजता भारतात आयफोनवर 5G सपोर्टची घोषणा केली आहे. ही सुविधा फक्त त्या यूजर्ससाठी आहे ज्यांच्याकडे जियो आणि एअरटेल कनेक्शन आहेत.
अॅपलच्या ‘या’ आयफोन मॉडेल्समध्ये 5G सपोर्ट मिळणार!
- अॅपलने दिलेल्या माहितीनुसार, 5G सपोर्ट २०२० किंवा नंतर लॉंच झालेल्या सर्व आयफोन मॉडेल्सवर अॅक्टिव्ह केले जाईल.
- यामध्ये आयफोन १२, आयफोन १३ आणि आयफोन १४ सिरीज तसेच नवीन आयफोन एसई मॉडेल्सचा समावेश आहे.
- याशिवाय, ज्या यूजर्सकडे 4G सिम आणि डेटा प्लान आहे, त्यांना कोणताही बदल करण्याची गरज नाही, फक्त त्यासाठी एअरटेल किंवा जियो सिम असणे आवश्यक आहे.
हे आयफोन 5G नेटवर्क सपोर्टसाठी सक्षम असणार…
- आयफोन १२
- आयफोन १२ मिनी
- आयफोन १२ प्रो
- आयफोन १२ प्रो मॅक्स
- आयफोन १३
- आयफोन १३ मिनी
- आयफोन १३ प्रो
- आयफोन १३ प्रो मॅक्स
- आयफोन १४
- आयफोन १४ प्लस
- आयफोन १४ प्रो
- आयफोन १४ प्रो मॅक्स
- आयफोन एसई २०२२
आयफोनमधील 5G नेटवर्क अॅक्टिव्ह करण्याची प्रक्रिया…
- प्रथम आयफोनवर Settings अॅप उघडा आणि जनरलवर टॅप करा आणि नंतर Software Update वर टॅप करा.
- येथे iOS 16.2 डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल. टर्म्स आणि कंडिशन्स स्वीकारा आणि अपडेट डाउनलोड करा.
- अपडेट इन्स्टॉल झाल्यावर आयफोन चालू झाल्यावर, नोटिफिकेशनमध्ये एक नवीन 5G स्टेटस आयकॉन दिसेल.
- हा पर्याय दिसत नसल्यास, सेटिंग्ज अॅप उघडू शकता आणि सेल्युलर > सेल्युलर डेटा टॅप करू शकता.
- फोनमध्ये दोन्ही सिम असल्यास, कोणता 5G वापरायचा आहे ते देखील तुम्ही निवडू शकता.