मुक्तपीठ टीम
आपल्या आयुष्यातील काही चांगले क्षण टिपण्यासाटी फोटो आणि व्हिडीओ काढणे हे आजच्या काळात महत्त्वाचे ठरते. कोणत्या ठिकाणी गेल्यावर मग, ते फिरण्यासाठी असो लग्नसमारंभ, मित्र-मैत्रिणींसोबत, सणसमारंभ किंवा इतर काही असो फोटो-व्हिडीओ काढणं हे महत्त्वाचेच झाले आहे. पण, कधी कधी आपण चुकून फोटो किंवा व्हिडीओ डिलीट करतो. मग आपण काय करावे? असा प्रश्न पडतो. परंतु, काळजी करण्याची गरज नाही ते आपण पुन्हाही मिळवू शकतो. स्मार्टफोन आणि टेक कंपन्या असे फोटो रिकव्हर करण्याचा पर्याय देतात.
फोटो किंवा व्हिडीओ डिलीट झाल्यास काय करावे?
- गुगल अॅप्स वापरत असल्यास, फोटो आणि व्हिडीओ फोनवरून डिलीट झाल्यानंतरही त्याचा बॅकअप घेतला जातो.
- या सेप्ट्सचे अनुसरण केल्यास फोटो पुन्हा मिळवता येतात.
- प्रत्येक गुगल अकाउंटमध्ये १५जीबी स्टोरेज उपलब्ध असते.
- हे स्टोरेज Google Drive, Gmail आणि Google Photosमध्ये शेअर केले जाते.
- हे स्टोरेज भरल्यावर, ते Google One वर अपग्रेड करू शकता.
- त्यानंतर स्टोरेज १०० जीबी किंवा त्याहून अधिक वाढते. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या योजना मिळतात, ज्या तुमच्या गरजेनुसार निवडू शकता.
- काही स्मार्टफोन कंपन्या ट्रॅश किंवा बिनचा पर्याय देतात.
- जेव्हा फोटो आणि व्हिडीओ डिलीट करता, तेव्हा ते या मोफत स्टोरेजमध्ये काही काळासाठी तो डेटा सेव्ह केला जातो जे रिकव्हर करता येते.
- याशिवाय, मायक्रोएसडी कार्ड वापरून फोटो आणि व्हिडीओ ट्रान्सफर करू शकता आणि गरज पडेल तेव्हा वापरू शकता.
जर कोणी, अॅपल यूजर असेल तर, आयक्लॉड देखील वापरता येते. आयक्लॉडसाठी साइन अप करता तेव्हा, ऑटोमॅटिकली ५जीबी मोफत स्टोरेज दिले जाते. यानंतर, स्टोरेजची आवश्यकता असल्यास, आयक्लॉड स्टोरेजची प्रीमियम सुविधा आयक्लॉड+ वर अपग्रेड करू शकता. यासाठी पैसे द्यावे लागतील, जर ५०जीबी स्टोरेज हवे असेल तर ७५ रुपये, २००जीबीसाठी २१९ रुपये आणि २टीबी जागेसाठी ७४९ रुपये द्यावे लागतील.