मुक्तपीठ टीम
काही वर्षांपूर्वी गाजलेली गीता आठवते तुम्हाला? तत्कालिन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानात गेलेल्या आपल्या भारताच्या लेकीला खडतर प्रयत्नांनी परत आणले. पण त्यानंतर सुरु झाला तिच्या पालकांचा शोध. परभणी जिल्ह्यातील मीना वाघमारे यांनी ती त्यांची मुलगी असल्याचा दावा केला आहे. पण हा केलेला दावा सत्यात उतरवण्यासाठी, मीना आणि त्यांच्या पतीची डीएनए चाचणी होणे आवश्यक आहे. ती होत नसल्यानं गीता सध्या परभणीच्या पहल फाऊंडेशनसोबत राहून इंग्रजी भाषा आणि कॉम्प्युटर चालवायला शिकत आहे.
गीताची कहानी ऐकली तर, तुम्हाला बजरंगी भायजानमधील लहान मुन्नीची आठवण येते. असेच काहीसे पाकिस्तानातून महाराष्ट्रात परतलेल्या गीता सोबत घडले आहे. आणि तिला भारतात आणण्यासाठी ६ वर्षांपूर्वी दिवंगत मंत्री सुषमा स्वराज यांनी हा पुढाकार घेतला होता. पालकांना शोधण्याच्या अनेक प्रयत्नांनंतर पाकिस्तानातून भारतात परतलेल्या मूक-बधिर गीता ही आपली मुलगी असल्याचा दालवा, महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील मीना वाघमारे यांनी केला आहे. हा केलेला दावा सत्यात उतरवण्यासाठी, मीना आणि त्यांच्या पतीची डीएनए चाचणी घ्यावी लागेल. परंतु, त्यासाठी भारत सरकारची परवानगी अद्याप मिळालेली नाही.
सहा महिन्यांपासून गीता परभणीतील मुक-बधीरांसाठी काम करणाऱ्या पहल फाउंडेशन या संस्थेच्या संरक्षणाखाली राहत आहे. गीताने संगणक आणि इंग्रजीचे शिक्षण घेतले आहे. ती आता लिहायलाही शिकली आहे. गीता भारतात येऊन जवळपास सहा वर्षे झाली आहेत.
गीता परभणीच्या पहल फाउंडेशनच्या देखरेखीखाली
- इंदूरच्या आनंदा मूक-बधिर संस्थेचे संचालक ज्ञानेंद्र पुरोहित यांच्या मते, गीताने आता इंग्रजी शब्द लिहायला सुरुवात केली आहे आणि वाक्येही बनवत आहे. सध्या सरकारकडून डीएनए चाचणीसाठी परवानगी नसल्यामुळे, ती संस्थेच्या देखरेखीमध्ये आहे.
- मीना वाघमारे आणि त्यांची मुलगी पूजा सतत गीताला भेटत राहतात.
- दोघेही घरून गीतासाठी जेवण आणतात आणि गीताही त्यांच्यासोबत जेवते.
- गीता एक किंवा दोन दिवस त्यांच्या घरीसुद्धा राहते.
गीताच्या रोजगारासाठी प्रयत्न
- गीताला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू
- हरवल्यानंतर पाकिस्तानला पोहोचलेल्या गीता यांना माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने भारतात आणले गेले.
- ती इंदूर येथील मूक -बधिर संस्थेच्या वसतिगृहात राहत होती.
- यानंतर, आनंद मूकबधिर संस्थेच्या संरक्षणाखाली राहिली. संस्था त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे.
- यादरम्यान गीताचे लग्न करण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
- गीताला मूकबधीर मुलांची शिक्षिका किंवा केअरटेकर बनण्याची इच्छा आहे.
- या परिस्थितीत आता ते गीताला सरकारी नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.