Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वय लपवणारा व्यायाम…५८ वर्षांच्या अनिता राजचं फिटनेस सिक्रेट!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Anita raj

मुक्तपीठ टीम

नव्वदीच्या दशकातील अनेक अभिनेत्री आजही अभिनयासोबत त्यांच्या फिटनेसमुळे प्रसिद्ध आहेत. या ज्येष्ठ अभिनेत्रींच्या पर्फेक्ट फिटनेसमुळे आज अनेक मुली त्यांना आपले आर्दश मानतात. अशाच वयाच्या ५८ व्या वर्षीही आपला बांधा जपलेल्या वर्षीय अभिनेत्री अनिता राज आपल्या फिटनेसमुळे चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडत आहे. इंडियन आयडॉलमध्ये त्यांना पाहिल्यावर फिटनेस चर्चेत आला. सोशल मीडियावर वर्कआऊटचे फोटो, व्हिडीओ शेअर करत अनिता राजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

अभिनेत्री अनिता राज निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी दररोज नियमित वेळेत वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करतात. त्यामध्ये वेट ट्रेनिंगसोबत क्रॉसफीट आणि पंचिंगसारख्या व्यायामाचा समावेश आहे. अनिता राज यांनी सांगितले की, ‘निरोगी, स्वस्थ राहण्यासाठी व्यायामासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे हेसुद्धा तितकेच आवश्यक आहे. तसेच काही कारणास्तव व्यायाम करण्यास वेळ मिळत नसेल तर वेगाने चालणे, पोहणे आणि आवश्यक तितकी झोप घेणे गरजेचे आहे’ असे त्यांनी सांगितले.

 

अनिता राज यांच्या मते, शक्ती ही शारिरिक क्षमतेतून येत नाही तर इच्छा शक्तीतून येते. त्यामुळे आपल्या शरिराचा आदर करा आणि व्यवस्थित पालनपोषण करा, असा सल्ला त्यांनी चाहत्यांना दिला आहे.

 

अनिता राज यांचा साठीतील तरुणाईचा फिटनेस मंत्रा!

  • अनिता राज आठवड्यातून तीन दिवस कार्डियो आणि अन्य दिवसांत वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि एचआयआयटी व्यायाम करतात.
  • वयाच्या २५ वर्षाआधी त्यांनी वेट ट्रेनिंग करण्यास सुरुवात केली.
  • महिलांनीसुद्धा वेट ट्रेनिंग करणे, वजन उचलणे गरजेचे आहे हे त्यांनी पटवून दिले आहे.
  • दररोज व्यायाम केल्याने निरोगी, स्वस्थ, तंदुरस्त राहण्यास मदत होते. तसेच वयाच्या ३५ वर्षानंतरही महिला व्यायाम सुरू करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
  • स्वस्थ मन हेच स्वस्थ शरीर असल्याचे त्यांनी सांगितले. जर मन निरोगी असेल, तर शरिरसुद्धा निरोगी राहते.
  • सकाळी ५.३० वाजता त्या जप करताता आणि त्यानंतर व्यायामाला सुरूवात करतात.
  • स्लिम ड्रीम, फिटनेस हंक अनिनेत्री अनिता राज या कोणत्याही आहारावर अवलंबून नाही.
  • त्यांच्या मते, आपण व्यायाम करण्यास जितकी मेहनत घेतो, त्याचप्रमाणे आहारातही पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.

 

अनिता राज खातात तरी काय?

  • अनिता राज यांच्या आहारात बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीचा समावेश असतो.
  • दुपारच्या वेळी त्या मांसाहारी पदार्थांचे सेवन करत नाहीत.
  • संध्याकाळी अंड्याचा पांढरा भाग आणि रात्री शेंगदाण्याचे सेवन करतात.
  • त्यांच्या मते, स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश आहारात करणे आवश्यक आहे.
  • फीट राहण्यासाठी शक्यतो बाहेरचे फास्ट फूड न खाण्याचा सल्ला त्यांनी चाहत्यांना दिला आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Anita rajdiethealthअभिनेत्री अनिता राज
Previous Post

पाकिस्तानातून परतलेली गीता महाराष्ट्रात इंग्रजी-कॉम्प्युटर शिकली!

Next Post

सेनादलांसाठी डीआरडीओकडून ‘मेड इन इंडिया’ अत्याधुनिक तंत्रज्ञान

Next Post
DRDO

सेनादलांसाठी डीआरडीओकडून ‘मेड इन इंडिया’ अत्याधुनिक तंत्रज्ञान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!