मुक्तपीठ टीम
येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन राहिला आहे. अनेक चाकरमनी गणेशोत्सवासाठी कोकणात जायची तयारी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले होते. मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ/सावंतवाडी दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आजपासून गाड्यांचे आरक्षण खुले झाले आहेत.
या अतिरिक्त गाड्यांसह मध्य रेल्वेच्या एकूण गणपती विशेष गाड्यांची संख्या २१२ झाली आहे. विशेष गाड्यांचे आरक्षण १५ ऑगस्टपासून सुरु झाले असून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाऊनलोड करा.
या आहेत कोकणात जायला विशेष लोकल
-
मुंबई ते कुडाळ विशेष लोकल
२४ ऑगस्टला रात्री १२.४५ वाजता (०११६७) विशेषगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कुडाळच्या दिशेने रवाना होणार असून ही गाडी त्याच दिवशी सकाळी ११.०० वाजता कुडाळला पोहोचेल.
कुडाळहून (०११६८) ही गाडी २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता निघेल आणि मुंबईत त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता दाखल होईल.
-
पनवेल ते कुडाळ गणपती विशेष लोकल
२४ ऑगस्टला कुडाळहून (०११७०) दुपारी १२ वाजता सुटेल आणि पनवेलला त्याच दिवशी रात्री १०.५५ला दाखल होईल.
२५ ऑगस्ट रोजी पनवेलहून विशेष गाडी (०११६९) रात्री १२.१० वाजता सुटेल आणि कुडाळ स्थानकात त्याच दिवशी सकाळी ९ वाजता पोहोचेल.
-
मुंबईते सावंतवाडी रोड गणपती विशेष लोकल
लोकमान्य टिळक टर्मिनसहून (०११७१) ही गाडी २५ ऑगस्टला पहाटे ४.५५ला सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४ वाजता पोहोचेल.
या गाडीचा (०११७२) परतीचा प्रवास २६ ऑगस्टला पहाटे ४ वाजता सुरू होईल आणि एलटीटी येथे त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता दाखल होईल.