Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मतदार जनजागरणासाठी निवडणूक आयोगातर्फे गणेशोत्सव सजावट-देखावा स्पर्धेचे आयोजन

माझा गणेशोत्सव माझा मताधिकार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
गणेशोत्सव सजावट-देखावा स्पर्धा

मुक्तपीठ टीम

स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा – सजावट स्पर्धा आयोजित केली आहे.

स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरीत्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात. याच धर्तीवर ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या स्पर्धेसाठी फोटो आणि ध्वनिचित्रफीत हे साहित्य पाठवायचे आहे.

मताधिकार हा १८ वर्षांवरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्यांच्या माध्यमातून, तर घरगुती पातळीवर गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील.

तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या देखाव्या-सजावटीतून जागृती करता येऊ शकते. पाणी, सार्वजनिक स्वच्छता, खड्डे-मुक्त रस्ते, चांगलं शिक्षण, चांगली घरं, अशा अनेक सार्वजनिक सुविधा नागरिकांना विनासायास प्राप्त होणं, हे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. मात्र नागरिकांना या सुविधांची केवळ माहिती असून उपयोग नाही, तर या सुविधा मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या लोकप्रतिनिधींवर आहे आणि ती पार पाडणाऱ्या लोकप्रतिनिधीची निवड करणंही तितकंच आवश्यक आहे.

त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मताधिकार बजावला पाहिजे आणि तो बजावताना पैसे, वैयक्तिक वापराच्या वस्तू, तात्पुरत्या आमिषांना बळी न पडता आपल्या परिसराच्या कायमस्वरूपी विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी बजावलेल्या मताधिकारामुळेच लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने लोकांनी लोकांचीं लोकांसाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. यांसारखे संदेश देखावे व सजावटीच्या माध्यमातून देणे अपेक्षित आहे.

निवडणूक आयोगाच्या स्पर्धेत भाग कसा घ्यायचा?

  • मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (https://ceo.maharashtra.gov.in/) आणि समाजमाध्यमांवर सदर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे.
  • गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी ३१ ऑगस्ट २०२२ ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गूगल अर्जावरील माहिती भरून आपल्या देखावा-सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे.

या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डाची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या, नवीन सुधारणान्वये मतदार नोदंणीसाठी लागू झालेल्या चार अर्हता तारखा यांसाठी प्रसार-प्रचार केला जावा, आणि अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

पाहा:


Tags: election commissionGaneshotsav Decoration-Appearance Competitiongood newsmaharashtra governmentmuktpeethVoter Awarenessगणेशोत्सव सजावट-देखावा स्पर्धाचांगली बातमीनिवडणूक आयोगमतदार जनजागरणमाझा गणेशोत्सव माझा मताधिकारमुक्तपीठ
Previous Post

‘बार्टी’ मार्फत एम.फिल., पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिपसाठी अर्जाचे आवाहन

Next Post

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात ०४ जागांवर भरती… २६ ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख

Next Post
khadki

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात ०४ जागांवर भरती... २६ ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!