Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

February 6, 2021
in सरकारी बातम्या
0
aditya thackeray

मुक्तपीठ टीम

 

निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर, जि. पुणे) या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यातील तिर्थक्षेत्रांच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी शासनाने पुढाकार घेतला असून याअंतर्गत श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर साठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधांची उभारणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्य शासनाने राज्यातील पर्यटनाच्या विविध घटकांचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला असून यामध्ये अध्यात्मिक पर्यटन तथा तीर्थक्षेत्र पर्यटनासही चालना देण्याचे निश्चित केले आहे. यासाठी तीर्थक्षेत्र स्थळांना पर्यटनदृष्ट्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. श्री क्षेत्र निरा नरसिंहपूरच्या विकासासाठी २६०.८६ कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत आतापर्यंत तरतुदीनुसार निधी वितरीत करण्यात आला असून आता २८.४८ कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षामध्येही या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी उर्वरित निधीची तरतूद करण्यात येईल. श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर तिर्थक्षेत्राचा सर्वांगिण विकास करुन पर्यटन विभागामार्फत तिथे भाविकांसाठी चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

 

श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर हे राज्यातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील लक्ष्मी नरसिंह मंदिर भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. भिमा आणि निरा नदीच्या संगमावर वसलेल्या या तिर्थक्षेत्राचे पर्यटनदृष्ट्याही महत्व आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविक तसेच पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या क्षेत्राचा सर्वांगिण विकास करुन, त्याचबरोबर भाविक आणि पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊन या तिर्थक्षेत्रास अध्यात्मिक पर्यटनस्थळांच्या नकाशावर ठळकपणे आणण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

 


Tags: Environment Minister Aditya Thackerayपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेलक्ष्मी नरसिंह मंदिरश्री क्षेत्र निरा नरसिंहपूर
Previous Post

मुंबई शहराच्या १२४ कोटींच्या वार्षिक आराखड्यास मान्यता

Next Post

#व्हाअभिव्यक्त बाबरी पाडल्याने व्यथित झालेल्या कवींची राम मंदिरासाठी देणगी

Next Post
Rammandir Article by heramb Kulkarni

#व्हाअभिव्यक्त बाबरी पाडल्याने व्यथित झालेल्या कवींची राम मंदिरासाठी देणगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!