मुक्तपीठ टीम
गेल्या आठवड्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी देशभरातून पीएफआयच्या प्रमुख लोकांना ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत राज्यभरातून पीआफआयच्या ४३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई केंद्रीय एजन्सीच्या माहितीवरुन राज्यातील स्थानिक पोलिसांनी केली आहे.
नाशिक-ठाण्यात पीएफआयवर कारवाई
- ठाणे गुन्हे शाखेने पीएफआयशी संबंधित चार जणांना अटक केली आहे.
- त्याचवेळी नाशिक पोलिसांनी पीएफआयशी संबंधित २ जणांना अटक केली आहे.
- आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
- नाशिकच्या मालेगाव शहरात छापेमारी सुरू आहे.
पुणे-मुंबईतूनही काही जणांना अटक…
- पुणे आणि मुंबईतूनही काही जणांना अटक करण्यात आली आहे.
- कल्याणमधील बाजारपेठ परिसरातून एकाला ताब्यात घेतले आहे.
- दाऊद सिराज अहमद शेख मुंब्रा, अब्दुल मतीन शेखानी मुंब्रा, फर्दिन जमील पैकर उर्फ गुड्डू कल्याण, आशीक अन्सारी उर्फ असिफ अन्सारी भिवंडी अशी ताब्यात घेतलेल्या ४ जणांची नावे आहेत.
नगर शहर आणि संगमनेर येथून दोघांना ताब्यात !!
- मराठवाड्यात औरंगाबादसह परभणी, जालनासह इतर जिल्ह्यांमध्येही पोलिसांनी पीएफआयशी संबंधित असलेल्यांवर कारवाई केली आहे.
- परभणीत पीएफआयच्या एका पदाधिकाऱ्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
- दुसरीकडे पीएफआयशी संबंधित असलेल्यांवर ‘एनआयए’ची अहमदनगर जिल्ह्यात कारवाई सुरू आहे.
- नगर शहर आणि संगमनेर येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय!
- महाराष्ट्र एटीएसने सोमवारी स्थानिक न्यायालयात सांगितले की, पीएफआय विरुद्धच्या छाप्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या पाच जणांचे अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट (आयएस) सारख्या संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे.
- त्यानंतर न्यायालयाने गेल्या आठवड्यात छाप्यांदरम्यान अटक केलेल्या पाच जणांच्या एटीएस कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.