डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीमुळे पुण्यातील पारस सकाटे या दोन वर्षांचा मुलाची गंभीर आरोग्य समस्येतून मुक्तता झाली. त्याच्या घरची आर्थिक स्थिती खूपच वाईट असल्यानं त्याला उपचार शक्य नव्हते. पण त्याचे कुटुंब डॉ. अशोक घोणेंच्या संपर्कात आले. त्यांनी एम एम फाऊंडेशन, चाइल्ड फाउंडेशन या समाजसेवी संस्थांच्या मदतीनं औंधच्या एम रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था केली. डॉ. स्वाती सुलक्षणे यांनी शस्त्रक्रिया केली आता पारस सकाटे इतरांसारखं जीवन जगू शकतोय. त्याच्या कुटुंबानी तो समस्यामुक्त झाल्यनंतर मोकळेपणाने भावना व्यक्त केल्या.