Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ई-श्रम पोर्टलवर २ लाखांपर्यंतचा मोफत विमा! समजून घ्या कशी करायची नोंदणी?

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
e sharm

मुक्तपीठ टीम

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक चांगली बातमी आहे. कामगार मंत्रालयाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी खास डिझाइन केलेले ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. देशभरात त्या पोर्टलवर नोंदणीही सुरू झाली आहे. हे पोर्टल असंघटित क्षेत्रातील कामगारांचा राष्ट्रीय पातळीवरील डेटाबेस तयार करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. या पोर्टलवर आपली नोंदणी करून जवळजवळ 38 कोटी मजूर लाभार्थी ठरू शकतील.

 

ई-श्रम पोर्टलवर अशाप्रकारे करा नोंदणी

  • सर्वप्रथम https://www.eshram.gov.in/ या पोर्टलवर जा.
  • नोंदणीसाठी आधार क्रमांक प्रविष्ट करताच तेथील डेटाबेसमधील कामगारांची सर्व माहिती आपोआप पोर्टलवर दिसेल.
  • व्यक्तीला त्यांच्या बँक माहितीसह मोबाईल नंबरसह इतर महत्वाची माहिती भरावी लागेल.
  • हा ऑनलाईन फॉर्म आणखी अपडेट केला जाऊ शकतो. एकतर स्वतःची नोंदणी करू शकता किंवा यासाठी देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटरची मदत घेऊ शकता.
  • नोंदणीनंतर, व्यक्तीच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबरसह ई-श्रम कार्ड दिले जाईल.
  • नोंदणीसाठी, सरकारने १४४३४ हा टोल फ्री क्रमांकही दिला आहे, जिथे त्यांच्याशी संबंधित सर्व माहिती घेतली जाऊ शकते. ७. राज्य सरकारही या पोर्टलद्वारे आपल्या कामगारांची नोंदणी करू शकतात.

 

कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार

  • केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, “या पोर्टलद्वारे असंघटित क्षेत्रातील कोट्यवधी कामगार शेवटच्या टप्प्यापर्यंत सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकतील.
  • ही आतापर्यंतची पहिलीच अशी यंत्रणा बनवण्यात आली आहे, जी कामगारांशी थेट जोडली आहे.
  • पंतप्रधानांनी पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना २ लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण देण्यात येईल, याला मान्यता दिली आहे.
  • जर पोर्टलवरील नोंदणीकृत कामगाराचा अपघात झाला असेल, त्यात जर मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्याला २ लाख रुपये मिळतील. त्याच वेळी, जर कामगार अपंग असेल तर त्याला या विमा योजनेअंतर्गत १ लाख रुपये मिळतील.

 

मोठ्या प्रमाणात पोर्टवरील नोंदणीत वाढ

  • कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी या पोर्टलवर जास्तीत जास्त संख्येने कामगारांनी नोंदणी करावी असे आवाहन केले आहे. जेणेकरून, सरकारी योजनांचा लाभ सर्वांना मिळू शकेल.
  • पोर्टल लाँचच्या निमित्ताने मंत्र्यांनी अजमेर, डिब्रूगढ, चेन्नई, वाराणसीसारख्या ठिकाणी कामगारांशी संवाद साधला.
  • सरकारच्या वतीने त्यांना योजना आणि पोर्टलवरील नोंदणीच्या फायद्यांविषयी थेट माहिती देण्यात आली.

 


Tags: bhupender yadavE sharmprime minister narendra modiई श्रमकामगार राज्यमंत्री रामेश्वर तेलीकेंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव
Previous Post

गडकरीनंतर आता ज्योतिरादित्य शिंदे! महाराष्ट्रातील विमानतळ विकासातील अडथळ्यांबद्दल मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र!

Next Post

भारतीय क्रीडा प्राधिकरणात २२० जागांसाठी भरती

Next Post
sai

भारतीय क्रीडा प्राधिकरणात २२० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!