Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिक्षण हक्क कायदा: खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवरील मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु! घ्या फायदा…मिळवून द्या गरजूंना फायदा!!

February 18, 2022
in उपयोगी बातम्या, करिअर, घडलं-बिघडलं
0
Students portal

मुक्तपीठ टीम

शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ (आर. टी. ई.) अन्वये, शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी खासगी प्राथमिक शाळांमध्ये (अल्पसंख्याक शाळा वगळून) २५ टक्के आरक्षित जागांवरील मोफत प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी संबंधित पालकांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत कलम १२ (१) (सी) अन्वये वंचित व दुर्बल घटकातील बालकांना नामांकीत खासगी विना अनुदानित शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश मिळू शकतो. त्यानुसार, मुंबई जिल्ह्यातील ३४३ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ६ हजार ४६९ जागा उपलब्ध आहेत.

पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन आज (दिनांक १६ फेब्रुवारी २०२२) पासून पाल्याच्या प्रवेशासाठी शासनाच्या student.maharashtra.gov.in (www नाही) या संकेत स्थळावरून किंवा  education.maharashtra.gov.in (www नाही) या सरलच्या वेबसाईट मधील विद्यार्थी (Student) या टॅबमधील आरटीई पोर्टलवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत.

 

अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. पालकांना या प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात  ५३ मार्गदर्शक मदत केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. पालकांनी संकेतस्थळावरील हेल्प डेस्क (Help Desk) या पर्यायावर Mumbai BMC हा जिल्हा निवडून या मदत केंद्रांची यादी पहावी. सदर केंद्रांवर मोफत अर्ज भरण्याची सुविधा असून त्याचा पालकांनी लाभ घ्यावा.

जे पालक स्वत:हून तसेच इतर कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन व मोबाईल ऍप (Mobile App) द्वारे अर्ज करु शकतात,  त्यांना मदत केंद्रावर येण्याची आवश्यकता नाही. अर्ज करण्यापूर्वी पालकांनी संकेतस्थळावरील माहिती काळजीपूर्वक वाचावी. तसेच नंतरही या प्रवेश प्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी सदर संकेतस्थळाला वेळोवेळी भेटी द्याव्यात.

ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेशासाठी  लागणाऱया सविस्तर माहितीसाठी महानगरपालिकेच्या mcgm.gov.in तसेच महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन केले आहे.


Tags: education maharashtrastudent maharashtra.खासगी प्राथमिक शाळाशिक्षण हक्क कायदा
Previous Post

आयकर न्यायाधिकरणात मुंबई, नागपुरात वरिष्ठ खासगी ३४ जागांवर संधी

Next Post

“आरोपांची राळ उडवून जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष वळविण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न”

Next Post
keshav Upadhye

"आरोपांची राळ उडवून जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष वळविण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!