मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात सुरक्षित आणि स्वच्छ देशांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा देश म्हणजे जपान. जपानमध्ये गोळीबाराची घटना अत्यंत अपवादानेच घडते, असे मानलं जातं. जपानमध्ये हँडगनवरही बंदी आहे. मात्र असं असताना जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे. गोळी लागल्याने आबे यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शिंजो आबे यांचं निधन झालं आहे.
हल्ल्यानंतर हृदयविकाराचा झटका, आबेंची प्रकृती गंभीर!!
- खरे तर आबे यांना गोळी लागल्याने त्यांचे खूप रक्त वाहून गेले होते.
- गोळी लागल्याने शिंजो आबे यांना हृदयविकाराचा झटका आला.
- त्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली.
- आबे यांना बेशुद्धावस्थेतच तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
- जवळजवळ तीन तास ते मृत्यूशी झुंज देत होते.
- दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
- आबे यांच्या एलडीपी (लिब्रल डेमोक्रॅटीक पार्टी) पक्षाच्या अधिकाऱ्यांनी कासीहारा शहरातील रुग्णालयामध्ये आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे
- जपानी पोलिसांनी एका संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.
शिंजो आबेंवर कसा झाला जिवघेणा हल्ला?
- जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे शुक्रवारी नारा येथील रस्त्यावर भाषण करत असताना मागून एका व्यक्तीने हल्ला केला.
- अचानक आबे खाली पडले.
- त्याच्या शरीरातूनही रक्त येत होते.
- शिंजो आबे अचानक पडल्यामुळे तिथे उपस्थित लोकांना काहीच समजले नाही.
- मात्र यादरम्यान काही लोकांनी तेथे गोळीबार केल्यासारखे काहीसे आवाज ऐकू आले.
- हल्लेखोरांनं त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे.
- संबंधित घेटनेचे फुटेज व्हायरल झाले आहेत.
- आज जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक मानल्या जाणाऱ्या जपानमधील हा हल्ला थक्क करणारा आहे.
शिंजो कमी वयात पंतप्रधान…सर्वाधिक काळ!
- ६७ वर्षीय शिंजो आबे गे लिबरल डेमॉक्रॅटिक पार्टीशी संबंधित आहेत.
- ते आक्रमक नेते मानले जातात.
- शिंजो यांना अल्यरेटिव्ह कोलायटिस हा एक आतड्याचा आजरा होता त्यामुळे त्यांनी २०२० मध्ये राजीनामा दिला होता.
- ते जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले आहेत.
- जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र आहेत.
- गेल्या वर्षी भारताने शिंजो आबे यांना पद्मविभूषण देऊन गौरविले होते.
- भारताशी संबंध चांगले करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला