Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चीनी मोबाइल कंपनी ‘विवो’ची ४६५ कोटी रोख रक्कम जप्त!

६२ हजार ४७६ कोटी देशाबाहेर पाठवल्याचा आरोप!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ed Action On Chinese Company Vivo India

मुक्तपीठ टीम

ईडीने चिनी स्मार्टफोन विवो आणि त्याच्याशी संबंधित २३ कंपन्यांवर छापे टाकून ६२ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. भारतातील कर चुकविण्यासाठी चिनी मोबाइल उत्पादक कंपनी ‘विवो’ने बेकायदा रीतीने सुमारे ५० टक्के म्हणजे ६२,७४६ कोटी रुपये चीनला पाठवले, अशी माहिती ईडीने उघड केली आहे. ‘विवो’ने चीनला पाठविलेली रक्कम ही त्यांच्या भारतातील एकूण उलाढालीच्या सुमारे निम्मी आहे. छापे टाकल्यानंतर कंपनीचे संचालक झेंगशेन ओऊ आणि झांग जी देश सोडून पळून गेले आहेत, असा आरोप आहे.

विवो मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या २३ संलग्न कंपन्यांच्या विरोधात बुधवारी सखोल शोध मोहिमेनंतर त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केलेली ४६५ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. याशिवाय ७३ लाख रुपयांची रोकड आणि दोन किलो सोन्याचे बार्सही जप्त करण्यात आले आहेत. ‘लोऊ’ हे विवोचे माजी संचालक आहेत. एप्रिल २०१८मध्ये ते भारतातून गेले. झेंगशेन ओऊ आणि झँग जेई यांनी २०२१मध्ये भारत सोडला.

ईडीच्या कारवाईत कर्मचाऱ्यांनी अडथळा आणला

ईडीने असाही आरोप केला आहे की विवो इंडियाच्या कर्मचार्‍यांनी शोध मोहिमेदरम्यान सहकार्य केले नाही आणि डिजिटल उपकरणे लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही डिजिटल माहिती मिळवण्यात एजन्सीच्या शोध पथकांना यश आले. विवो पूर्वी, Xiaomi वर देखील कर चुकवेगिरीसाठी कारवाई करण्यात आली होती, ज्यामध्ये भारतात विद्यमान Xiaomi च्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.

या कारवाईवर चिनी दूतावासांकडून संताप व्यक्त!

  • छापेमारीनंतर भारतातील चीनच्या दूतावासाने ईडीचा निषेध केला आहे.
  • चिनी दूतावासातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय तपास यंत्रणांचा चिनी कंपनीबाबतचा दृष्टिकोन दुर्दैवी आहे.
  • चिनी कंपनीला परदेशात व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या जातात, त्यानंतरही अशी कारवाई व्यवसायासाठी योग्य नाही.
  • यावर, ईडीने उत्तर दिले की ही कारवाई नियमानुसार करण्यात आली आहे आणि कायद्याचे पूर्णपणे पालन केले जात आहे.

Tags: chinaEDVivo Indiaईडीचीनभारतविवो मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
Previous Post

गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणूक खर्चात कपात, १०० सदस्यांपर्यंत ७,५०० रूपये, बिनविरोध निवडणुकीसाठी ३,५०० रूपये!

Next Post

जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक जपान! तरीही कशी झाली माजी पंतप्रधानांची हत्या?

Next Post
Shinzo Abe

जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक जपान! तरीही कशी झाली माजी पंतप्रधानांची हत्या?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!