मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. अखेर १ वर्ष १ महिना २७ दिवसांनी देशमुखांची झाली आहे. आर्थर रोड तुरुंगातून ते बाहेर आले. देशमुख यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयची मागणी हाय कोर्टाने फेटाळल्यानंतर अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आलेत. गेल्या वर्षी २ नोव्हेंबररोजी ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी अटक केली होती. गेल्या १४ महिन्यांपासून ते ‘ईडी’ कोठडीत होते.
कार्यकर्त्यांची जेलबाहेर प्रचंड गर्दी…
- तुरुंगातून बाहेर येताच ते सर्वप्रथम सिद्धिविनायक मंदिरात जाऊम दर्शन घेणार आहेत.
- अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील.
- प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी जेलबाहेर स्वागतासाठी हजेरी लावली.
- अनिल देशमुख यांची सुटका होणार, या बातमीनंतर आर्थर रोड तुरुंगाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली.
- आर्थर रोडबाहेर टायगर इज बॅक, हौसला बुलंद रहे, असे बॅनर घेतलेल्या कार्यकर्त्यांची जेलबाहेर प्रचंड गर्दी जमा झाली होती.
या अटींचं पालन करावं लागणार…
- ईडी आणि सीबीआय दोघांकडून अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे.
- १२ डिसेंबर रोजी मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर केला होता.
- अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतरही त्यांना जेलबाहेर काही अटींचं पालन करावं लागणार आहे.
- त्यांना विना परवानगी मुंबईच्या बाहेर जाता येणार नाही.