Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परदेशी राजदुतांनाही खादीच्या फॅशनची भुरळ…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Khadi Fashion

मुक्तपीठ टीम

खादीच्या सातत्याने वाढणाऱ्या लोकप्रियतेमुळे या वस्त्रप्रकाराची परदेशी राजदूतांनाही भुरळ पडली असून त्यामुळेच थायलंडचे भारतातील राजदूत एच ई एमएस पट्टरट हाँगटाँग आणि ओमानचे भारतातील राजदूत इस्सा ऐशीबानी यांनी  इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर-२०२२ (आयआयटीएफ) मधील खादी दालनास आज भेट दिली.

खादीच्या जागतिक लोकप्रियतेची राजदूतांनी प्रशंसा केली असून त्यांनी महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांसोबत  खादी दालनातील सेल्फी स्थळावर सेल्फीही काढून घेतली. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे संचालक(प्रसिद्धी)  संजीव पोसवाल यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही राजदूतांनी खादी इंडिया दालनात असलेल्या वेगवेगळ्या खादी वस्त्रप्रावरणांच्या वैविध्याची आणि खादी कारागिरांच्या उत्कृष्ट कलाकुसरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

राजदूतांनी चरख्यावर सूत कताई करण्याचे तसेच चिकणमातीची भांडी बनवण्याचे, अगरबत्ती आणि हाताने कागद बनवण्याचे प्रात्यक्षिक पाहिले. तसेच राजदूतांनी खादी वस्त्रप्रावरणांपासून बनवण्यात आलेल्या उत्कृष्ट हस्तकलेचे सादरीकरण करणाऱ्या दालनास आणि  तयार कपडे, वनौषधींपासून आरोग्य उत्पादने आणि विविध प्रकारची ग्रामोद्योग उत्पादने ठेवलेल्या दालनांनाही भेट दिली.

थाई राजदूत म्हणाले की, आयआयटीएफमध्ये इतक्या भव्य प्रमाणावर खादी दालन उभारल्याबद्दल मी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अभिनंदन करतो. या दालनाने खादी कारागिरांना आपापल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. भारत आणि थायलंड यांच्यात खादीची एक विशेष जुळणारी तार आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी खादीला जागतिक स्तरावर उत्तेजन देण्यासाठी एकत्र काम करण्याचे मार्ग शोधावे, असे ते म्हणाले.


Tags: Foreign Ambassadorsgood newshappeningsIndia International Trade Fair-2022Khadi Fashionmuktpeethइंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर-२०२२खादी फॅशनघडलं-बिघडलंचांगली बातमीपरदेशी राजदुतमुक्तपीठ
Previous Post

सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप २०२२: अर्ज करण्याची आणखी एक संधी, ३० नोव्हेंबर अंतिम तारीख

Next Post

UPSC पूर्व प्रशिक्षणासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा!

Next Post
upsc

UPSC पूर्व प्रशिक्षणासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!