मुक्तपीठ टीम
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरची सत्ता हाती घेतल्यापासून अनेक मोठे बदल केले आहेत. मागेच ट्विटरच्या व्हेरिफाइटड अकाउंटच्या बाबतीत चर्चा सुरू होती. ट्विटरवर सर्वात जास्त चर्चा व्हेरिफाईड अकाउंट आणि त्याच्या सबस्क्रिप्शन चार्जबद्दल आहे. ट्विटरने ‘ट्विटर ब्लू’ नावाची सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली होती, ज्यामध्ये तुम्ही काही पैसे देऊन ट्विटर अकाउंट व्हेरिफाइड करू शकाल. सध्याचे सबस्क्रिप्शन मॉडेल अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूकेमध्ये लॉंच केले गेले आहे. मात्र, अनेक फेक अकाऊंट व्हेरिफाय झाल्यामुळे ते बंद करावे लागले. आता पुन्हा कंपनी हे फिचर एका नवीन प्लानसह लॉंच करणार आहे.
ब्लू टिक सबस्क्रिप्शन घेण्यासाठी आयफोनचा वापरही करता येणार! जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स
- ट्विटर अॅप उघडा.
- अॅप उघडल्यानंतर, ‘प्रोफाइल पिक्चर’ वर टॅप करा.
- यानंतर ‘ट्विटर ब्लू’ पर्यायावर टॅप करा.
- यानंतर ‘सबस्क्राईब’वर बटणावर क्लिक करा.
- असे म्हटले जात आहे की, ट्विटर यूजर्सना सब्सक्रिप्शन घेतल्यानंतर ९० दिवसांनी ब्लू टिक दिली जाईल. .
ट्विटर ”ब्ल्यू टिक’ सबस्क्रिप्शन मॉडेल २९ नोव्हेंबर रोजी पुन्हा लाँच होण्याची शक्यता?
- ९ नोव्हेंबर रोजी ‘ट्विटर ब्लू’ ही सबस्क्रिप्शन सेवा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी ती बंद करावी लागली.
- याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बनावट अकाउंटचे व्हेरिफिकेशन असल्याचे सांगितले जात आहे.
- यानंतर, ट्विटरने २९ नोव्हेंबर रोजी हे सबस्क्रिप्शन मॉडेल पुन्हा लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे.