Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूजीसीच्या विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी पाच नॅशनल फॅलोशिप! १० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करा…

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
ugc

मुक्तपीठ टीम

भारतातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि त्यांच्याकडे शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिभा आहे, अशांसाठी भारत सरकार आणि राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. ज्याद्वारे होतकरू विद्यार्थी त्यांचे अध्यापन पूर्ण करू शकतात आणि त्यांचे जीवन दिशाहीन होण्यापासून वाचू शकते.

यूजीसी म्हणजेच यूनिव्हर्सिटी ग्रॅंट कमिशनने देशभरातील विद्यापीठांमधील संशोधन विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध प्रकारच्या राष्ट्रीय फेलोशिपची घोषणा केली आहे. यूजीसीने एकूण पाच फेलोशिप योजना जाहीर केल्या आहेत. फेलोशिप आणि अनुदान संबंधित तपशीलवार माहिती यूजीसीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवार यूजीसी वेबसाइटला भेट देऊन अधिक तपशील मिळवू शकतात. यूजीसी सचिव प्रा. रजनीश जैन यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार १० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

यूजीसी फेलोशिप, संशोधन अनुदान याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या

  • फेलोशिपचे उद्दिष्ट नियमितपणे नियुक्त केलेल्या प्राध्यापक सदस्यांना संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे.
  • फेलोशिप कार्यक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे, या उपक्रमात १० लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
  • पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप ही विज्ञान, औषध आणि अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांसाठी आहे. फेलोशिप प्रोग्रामचा कालावधी दोन वर्षांचा आहे.
  • फेलोशिप/ संशोधन अनुदानासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ५० हजार रूपय आणि आकस्मिकता म्हणून ५० हजार रूपये प्रति वर्ष मिळतील.
  • उमेदवारांची उच्च वयोमर्यादा ६७ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

यूजीसी फेलोशिप प्रोग्रामविषयी अधिक माहितीसाठी ugc.ac.in या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

यूजीसीद्वारे जारी केलेल्या पाचही फेलोशिप मिळविण्यास इच्छुक असलेले शिक्षक आणि विद्यार्थी वेळेवर यूजीसी वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. विद्यापीठ प्रशासन अर्ज करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करेल. यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुढे यावे. जास्तीत जास्त उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यूजीसीच्या अशा योजनेमुळे संशोधनात गुणवत्ता येईल. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना यूजीसीची फेलोशिप मिळेल.

यूजीसीद्वारे ऑफर केलेल्या पाच फेलोशिप योजनांमध्ये एस राधाकृष्णन यूजीसी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप, नवीन शिक्षकांसाठी डॉ. डी. एस कोठारी संशोधन अनुदान, सेवारत प्राध्यापकांसाठी संशोधन अनुदान, एकल मुलीसाठी एमेरिटस फेलोशिप आणि सावित्रीबाई फुले फेलोशिप यांचा समावेश आहे.

पाहा:


Tags: careereducationgood newsmuktpeethNational FellowshipUGCUniversity Grants Commissionकरिअरचांगली बातमीनॅशनल फॅलोशिपमुक्तपीठयूजीसीयूनिव्हर्सिटी ग्रॅंट कमिशनशिक्षण
Previous Post

पुण्याच्या एआयसीटीएस संस्थेच्या तज्ज्ञांनी नवजात अर्भकावर केली पी डी ए स्टेन्टींग ही दुर्मिळ हायब्रीड शस्त्रक्रिया

Next Post

रेनॉच्या वाहनांवर ५० हजार रूपयांपर्यंत बचतीची संधी, क्विड, ट्रायबर, कायगर गाड्यांवर मिळणार मोठी सवलत!

Next Post
Renault Car

रेनॉच्या वाहनांवर ५० हजार रूपयांपर्यंत बचतीची संधी, क्विड, ट्रायबर, कायगर गाड्यांवर मिळणार मोठी सवलत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!