Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साजरे करण्यातील राजकारण मांडणारा…जयंती! मर्यादा ओलांडत नवी झेप!

लॉकडाऊन नंतर 'जयंती' हा पहिला मराठी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
jayanti movie

पूजा शिंदे / मुक्तपीठ टीम

लॉकडाऊनमध्ये जर कोणत्या गोष्टीला ब्रेक लागला नसेल तर ती गोष्ट म्हणजे मनोरंजन! OTT प्लॅटफॉर्मच्या कृपेने प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन चालूच आहे. पण चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची ती मजा सर्वच जण मिस करत होते. कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे देशभरातील जवळपास सर्वच चित्रपटगृहे उघडण्यात आली असून अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. हिंदी चित्रपटांच्या गर्दीत एक पहिला मराठी चित्रपट ‘जयंती’ प्रदर्शित होणार आहे.

 

‘जयंती’ प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत!

  • जयंती हा लॉकडाउन नंतर चित्रपट गृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट आहे.
  • यासोबतच आणखीही काही कारणांसाठी चित्रपट चर्चेत आहे.
  • मागच्या आठवड्यात चित्रपटाचा ट्रेलर युट्युब वर प्रदर्शित करण्यात आला.
  • अवघ्या एका आठवड्यात १२ लाख लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे.
  • चित्रपटाच्या २ गाण्यांना देखील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.
  • सुप्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोशल मीडिया वर ‘जयंती’चा ट्रेलर शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

कथेची उत्तम जाण असणाऱ्या आणि कथानक उत्कृष्टरित्या पडद्यावर मांडणाऱ्या सुप्रसिध्द दिग्दर्शकाने स्वतः या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत संपुर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. म्हणजे नक्कीच हा चित्रपट देखील उत्कृष्ट धाटणीतील असणार आणि प्रेक्षक नक्कीच हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असणार यात तिळमात्र शंका नाही.

jayanti move

दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित “जयंती” सिनेमा १२ नोव्हेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता ऋतुराज वानखेडे आणि अभिनेत्री तितिक्षा तावडे मराठी सिनेसृष्टीत प्रथम पदार्पण करत आहेत. त्याचप्रमाणे  सिनेमामध्ये जेष्ठ अभिनेते वीरा साथीदार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, तसेच पॅडी कांबळे आणि अंजली जोगळेकर यांच्या देखील भूमिका आहेत.

 

आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांनी भारतभूमीला दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यामुळेच अशा महापुरुषांची जयंती साजरी करण्याची, त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याची आपल्याकडे परंपरा आहे. परंतु अलीकडच्या काही वर्षांत या सामान्य लोकांच्या भावनिक उत्सवाला सातत्याने राजकीय वळण दिले जात असल्याचे दिसुन येते. याच सर्व बाबींवर ‘जयंती’ चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.


Tags: jayantinagraj manjuleRuturaj wankhedeTiteeksha Tawdeजयंतीतितीक्षा तावडेनागराज मंजुळेरुतुराज वानखेडे
Previous Post

ऊस एफआरपीचा प्रश्न पेटला, सांगलीत दोन साखर कारखान्यांचे ट्रॅक्टर्स पेटवले!

Next Post

पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या खलाशाच्या कुटुंबाला ‘जिजाऊ’ची आर्थिक मदत

Next Post
Jijau Foundation

पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या खलाशाच्या कुटुंबाला 'जिजाऊ'ची आर्थिक मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!