Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पहिला स्वदेशी व्यावसायिक चिपसेट २०२४पर्यंत होणार लाँच, अभिमान वाटावा अशी बातमी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
chipset

मुक्तपीठ टीम

भारताचा आपला स्वत:चा पहिला स्वदेशी चिपसेट व्यावसायिकरित्या लाँच करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. २०२३च्या अखेरीस किंवा २०२४च्या सुरुवातीला हा चिपसेट लाँच होण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. एकदा भारताचा स्वत:चा स्वदेशी चिपसेट तयार झाला की भारतीय उद्योगांचं बाहेरच्या देशांवरील परावलंबित्व संपेल.

पहिला चिपसेट डिसेंबर २०२३ किंवा २०२४च्या सुरुवातीला उपलब्ध होणार…

  • पॉवर आणि वेगा प्रोसेसरसाठी सिलिकॉनचा पहिला चिपसेट डिसेंबर २०२३ किंवा २०२४च्या सुरुवातीला उपलब्ध असेल.
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली.
  • ते म्हणाले की, डिजिटल इंडिया -RISC-V (DIR-V) कार्यक्रमाचा उद्देश मायक्रोप्रोसेसरच्या भावी पिढ्या तयार करणे हे आहे.
  • यामुळे जे मोबिलिटी, कॉम्प्युटिंग आणि डिजिटायझेशनवर भारताच्या धोरणात्मक फोकससाठी आवश्यक गरज पूर्ण करेल.
  • हे एक मोठे पाऊल असल्याचे ते म्हणाले.

आयआयटी मद्रास आणि सीडॅकची कामगिरी!

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या मायक्रोप्रोसेसर डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत आयआयटी मद्रास आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (CDAC) यांनी ओपन सोर्स आर्किटेक्चरचा वापर करून अनुक्रमे शक्ती (३२ बिट) आणि वेगा (६४ बिट) नावाचे दोन मायक्रोप्रोसेसर विकसित केले आहेत.

सेमिकंडक्टर एकोसिस्टमसाठी मोठी योजना!

  • DIR-V उपक्रम हा देशातील सेमिकंडक्टर इकोसिस्टम तयार करण्यासाठी सरकारच्या ७६,००० कोटी रुपयांच्या योजनेचा एक भाग आहे.
  • सरकारने IIT मद्रासचे संचालक प्रोफेसर व्ही कामकोटी यांची मुख्य आर्कीटेक्ट म्हणून आणि CDAC त्रिवेंद्रमचे वैज्ञानिक कृष्णकुमार राव यांची DIR-V कार्यक्रमाचे कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली आहे.
  • DIR-V कार्यक्रम एकात्मिक बहु-संस्थात्मक आणि बहु-स्थानिक संघासह देशात चालू असलेल्या प्रयत्नांना एकत्रित करेल आणि त्याचा लाभ घेईल.

 


Tags: CEDACgood newsIIT MadrasIndigenous Commercial ChipsetmuktpeethPower & Vega ProcessorSemiconductor EcosystemSilicon Chipsetआयआयटी मद्रासचांगली बातमीपॉवर आणि वेगा प्रोसेसरमुक्तपीठसिलिकॉन चिपसेटसीडॅकसेमिकंडक्टर एकोसिस्टमस्वदेशी व्यावसायिक चिपसेट
Previous Post

पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमतीत घट! मोदी सरकारच्या दिलाशात ठाकरे सरकार भर घालणार?

Next Post

मधाचे पहिलं गाव महाबळेश्वरचे मांघर…साकारलं तरी कसं? इतर जिल्ह्यांमध्ये कसं साकारणार?

Next Post
Satara

मधाचे पहिलं गाव महाबळेश्वरचे मांघर...साकारलं तरी कसं? इतर जिल्ह्यांमध्ये कसं साकारणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!