Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी एकात्मिक ई-कॉमर्स अॅप सादर करणारी मिशो ठरली पहिली भारतीय कंपनी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Meesho

मुक्तपीठ टीम

देशातील लघु व्यवसायांच्या डिजिटलीकरणाला आणखी मदत करण्यासाठी भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इंटरनेट कॉमर्स कंपनी मिशो ने आज अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी एकात्मिक ई – कॉमर्स मोबाइल अॅप सादर करण्याची घोषणा केली. खरेदीदार आणि विक्रेते दोघांसाठी एकत्रित मोबाईल अॅप सादर करणारी मिशो ही भारतातील पहिली भारतीय ई-कॉमर्स कंपनी आहे.

 

 

अॅपच्या या नवीनतम आवृत्तीत मिशो वापरकर्ते आता एका क्लिकवर खरेदीदार आणि विक्रेता या दोन इंटरफेसमध्ये टॉगल करू शकतात. विशेषतः विक्रेते जे पूर्वी फक्त वेब आवृत्त्यांवर उपस्थित होते ते अॅपवरील विविध वैशिष्ट्यांचा लाभ घेऊन उत्कृष्ट ई-कॉमर्स अनुभवाची अपेक्षा करू शकतात. यामध्ये ऑर्डर प्रक्रिया, पेमेंट ट्रॅकिंग, इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि विक्रेता पाठबळ यांचा समावेश आहे. पाठबळ वा समर्थन वैशिष्ट्यामध्ये उत्पादन कॅटलॉगची छायाचित्रे अपलोड करणे, मिशोच्या किंमत आणि उत्पादन शिफारस साधनांसह जाहिराती तयार करणे आणि ठेवणे या गोष्टी समाविष्ट आहेत. युनिफाइड म्हणजेच एकत्रित अॅप आणि त्याची वैशिष्ट्ये या प्लॅटफॉर्मवरील ४ लाखांहून अधिक विक्रेत्यांना ऑनलाईन पद्धतीने यशस्वी होण्यास मदत करेल.

 

 

या सादरीकरणाबद्दल बोलताना मिशोचे मुख्य उत्पादन अधिकारी कीर्ती वरुण अवसरला म्हणाले, “आमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सर्व वैशिष्ट्यांचा लाभ घेण्यासाठी पूर्वी आवश्यक असलेले डेस्कटॉप/लॅपटॉप मिशोच्या अनेक विक्रेत्यांकडे उपलब्ध नाहीत. त्यांना विनाअडथळा अधिक अखंडपणे ई-कॉमर्स व्यवसायाचा अनुभव प्रदान करण्यासाठी आम्ही मोबाईल-फर्स्ट दृष्टीकोन स्वीकारला आहे. त्यामुळे विक्रेत्यांना कमीत कमी कष्टात स्वतःच्या व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यात मदत होईल. अँड्रॉइड अॅप च्या जोडीला आम्ही सेलर हबच्या मोबाइल वेब आवृत्तीवर वापरकर्त्याचा अनुभव देखील संपूर्णपणे पुन्हा घेतला आहे. आमचे नवीनतम अँड्रॉइड अॅप हे वैयक्तिक उद्योजकांसह १०० दशलक्ष लघु व्यवसायांना ऑनलाइन पद्धतीने यशस्वी होण्यासाठी सक्षम करण्याच्या मिशोच्या संकल्पनेची पावती आहे.”

 

 

या महिन्याच्या सुरुवातीला मिशोने आपल्या विक्रेत्यांसाठी या उद्योगक्षेत्रातील अशा प्रकारचा पहिलाच ‘झिरो पेनल्टी’ आणि ‘7-डे पेमेंट्स’ अशा दोन नवीन उपक्रमांची घोषणा केली.  पहिल्या उपक्रमातून हे निश्चित होते की विक्रेत्यांना स्वत: किंवा ऑर्डर रद्द झाल्याबद्दल दंड आकारला जाणार नाही; तर दुसऱ्या उपक्रमातून विक्रेत्यांना अधिक वेगाने पैसे दिले जातात. त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात पैसे परत गुंतवण्यास मदत होते. गेल्या काही वर्षांत, मिशोने सातत्याने देशभरातील विक्रेत्यांसाठी डिजिटलीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्यात जुलै २०२१ मध्ये जाहीर केलेला उद्योगक्षेत्रातील पहिलाच ०% कमिशन मॉडेलचा समावेश आहे. मिशोचे नवीनतम इंटिग्रेटेड अँड्रॉइड अॅप्लिकेशन समजण्यास आणि वापरण्यास सोपे आहे.  विक्रेत्यांना डिजिटल व्यवहार कसे सोपे आणि कार्यक्षम आहे हे यातून समजण्यास मदत होत आहे. भारतातील सर्वात हलके ई-कॉमर्स अॅप म्हणून आपले स्थान कायम राखताना अगदी नवीनतम बदलांसह गुगल प्ले स्टोअरवर याचा कॉम्प्रेस्ड एपिके आकार १५ एमबी आहे.

 

About Meesho

Meesho is India’s fastest-growing internet commerce platform. With a vision to enable 100 million small businesses, including individual entrepreneurs, to succeed online, Meesho is democratising internet commerce and bringing a range of products and new customers online. The Meesho marketplace provides small businesses, which includes SMBs, MSMEs and individual entrepreneurs, access to millions of customers, selection from 700+ categories, pan-India logistics, payment services and customer support capabilities to efficiently run their businesses on the Meesho ecosystem.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: BuyersGoodNewsMorningMeeshoMeesho E-Commerce AppSellersई-कॉमर्स अॅपमिशो
Previous Post

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्युनियर रेसिडेंट डॉक्टर पदावर नोकरीची संधी

Next Post
Aurangabad government medical college

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्युनियर रेसिडेंट डॉक्टर पदावर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!