मुक्तपीठ टीम
देशातील लघु व्यवसायांच्या डिजिटलीकरणाला आणखी मदत करण्यासाठी भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इंटरनेट कॉमर्स कंपनी मिशो ने आज अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी एकात्मिक ई – कॉमर्स मोबाइल अॅप सादर करण्याची घोषणा केली. खरेदीदार आणि विक्रेते दोघांसाठी एकत्रित मोबाईल अॅप सादर करणारी मिशो ही भारतातील पहिली भारतीय ई-कॉमर्स कंपनी आहे.
अॅपच्या या नवीनतम आवृत्तीत मिशो वापरकर्ते आता एका क्लिकवर खरेदीदार आणि विक्रेता या दोन इंटरफेसमध्ये टॉगल करू शकतात. विशेषतः विक्रेते जे पूर्वी फक्त वेब आवृत्त्यांवर उपस्थित होते ते अॅपवरील विविध वैशिष्ट्यांचा लाभ घेऊन उत्कृष्ट ई-कॉमर्स अनुभवाची अपेक्षा करू शकतात. यामध्ये ऑर्डर प्रक्रिया, पेमेंट ट्रॅकिंग, इन्व्हेंटरी व्यवस्थापन आणि विक्रेता पाठबळ यांचा समावेश आहे. पाठबळ वा समर्थन वैशिष्ट्यामध्ये उत्पादन कॅटलॉगची छायाचित्रे अपलोड करणे, मिशोच्या किंमत आणि उत्पादन शिफारस साधनांसह जाहिराती तयार करणे आणि ठेवणे या गोष्टी समाविष्ट आहेत. युनिफाइड म्हणजेच एकत्रित अॅप आणि त्याची वैशिष्ट्ये या प्लॅटफॉर्मवरील ४ लाखांहून अधिक विक्रेत्यांना ऑनलाईन पद्धतीने यशस्वी होण्यास मदत करेल.
या सादरीकरणाबद्दल बोलताना मिशोचे मुख्य उत्पादन अधिकारी कीर्ती वरुण अवसरला म्हणाले, “आमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सर्व वैशिष्ट्यांचा लाभ घेण्यासाठी पूर्वी आवश्यक असलेले डेस्कटॉप/लॅपटॉप मिशोच्या अनेक विक्रेत्यांकडे उपलब्ध नाहीत. त्यांना विनाअडथळा अधिक अखंडपणे ई-कॉमर्स व्यवसायाचा अनुभव प्रदान करण्यासाठी आम्ही मोबाईल-फर्स्ट दृष्टीकोन स्वीकारला आहे. त्यामुळे विक्रेत्यांना कमीत कमी कष्टात स्वतःच्या व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यात मदत होईल. अँड्रॉइड अॅप च्या जोडीला आम्ही सेलर हबच्या मोबाइल वेब आवृत्तीवर वापरकर्त्याचा अनुभव देखील संपूर्णपणे पुन्हा घेतला आहे. आमचे नवीनतम अँड्रॉइड अॅप हे वैयक्तिक उद्योजकांसह १०० दशलक्ष लघु व्यवसायांना ऑनलाइन पद्धतीने यशस्वी होण्यासाठी सक्षम करण्याच्या मिशोच्या संकल्पनेची पावती आहे.”
या महिन्याच्या सुरुवातीला मिशोने आपल्या विक्रेत्यांसाठी या उद्योगक्षेत्रातील अशा प्रकारचा पहिलाच ‘झिरो पेनल्टी’ आणि ‘7-डे पेमेंट्स’ अशा दोन नवीन उपक्रमांची घोषणा केली. पहिल्या उपक्रमातून हे निश्चित होते की विक्रेत्यांना स्वत: किंवा ऑर्डर रद्द झाल्याबद्दल दंड आकारला जाणार नाही; तर दुसऱ्या उपक्रमातून विक्रेत्यांना अधिक वेगाने पैसे दिले जातात. त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात पैसे परत गुंतवण्यास मदत होते. गेल्या काही वर्षांत, मिशोने सातत्याने देशभरातील विक्रेत्यांसाठी डिजिटलीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्यात जुलै २०२१ मध्ये जाहीर केलेला उद्योगक्षेत्रातील पहिलाच ०% कमिशन मॉडेलचा समावेश आहे. मिशोचे नवीनतम इंटिग्रेटेड अँड्रॉइड अॅप्लिकेशन समजण्यास आणि वापरण्यास सोपे आहे. विक्रेत्यांना डिजिटल व्यवहार कसे सोपे आणि कार्यक्षम आहे हे यातून समजण्यास मदत होत आहे. भारतातील सर्वात हलके ई-कॉमर्स अॅप म्हणून आपले स्थान कायम राखताना अगदी नवीनतम बदलांसह गुगल प्ले स्टोअरवर याचा कॉम्प्रेस्ड एपिके आकार १५ एमबी आहे.
About Meesho
Meesho is India’s fastest-growing internet commerce platform. With a vision to enable 100 million small businesses, including individual entrepreneurs, to succeed online, Meesho is democratising internet commerce and bringing a range of products and new customers online. The Meesho marketplace provides small businesses, which includes SMBs, MSMEs and individual entrepreneurs, access to millions of customers, selection from 700+ categories, pan-India logistics, payment services and customer support capabilities to efficiently run their businesses on the Meesho ecosystem.