Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शी जिनपिंग यांचं पुन्हा सत्तेत येणं आणि सीमेवरील चीनी कुरापती! नेमका संबंध कसा?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Xi-Jinping-waving-ap

मुक्तपीठ टीम

शी जिनपिंग हे जगातील हुकूमशहा नेत्यांपैकी एक आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक माओ त्से तुंग यांच्यानंतर चीनचे ते पहिले शासक आहेत. शी जिनपिंग यांची तिसर्‍यांदा चीनचे अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांची पुढील पाच वर्षांसाठी चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली असली तरी आता ते या पदावर कायमस्वरूपी राहतील, असे मानले जात आहे. शी जिनपिंग यांची चीनच्या अध्यक्षपदी आणि सीपीसीच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याने भारत-चीन द्विपक्षीय संबंध आणखीच वाढण्याची भीती आता खरी ठरताना दिसत आहे. अरुणाचलमधील सीमेवर कुरापती करून तणाव वाढण्याच्या अशा घटना अधिकच वाढण्याची शक्यता आहे. तवांगमधील संघर्षातून तसेच संकेत मिळत असल्याचं मानलं जातं.

सीमेवरील चीनी कुरापती!

  • १५ जून २०२० पासून भारत-चीन सीमा वादात तणावात वाढ
  • १५ जून २०२० रोजी चिनी सैनिकांनी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराच्या जवानांसोबत चकमकीची घटना घडवून आणली होती.
  • चिनी सैन्याने घुसखोरी केल्याने भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमावर्ती भागात तणाव कायम होता.
  • मात्र, चिनी सैन्याची घुसखोरी आणि सीमेवर तणाव कायम आहे.

तिबेटमध्ये लष्करी क्षमतेत वाढ!

  • १९६२ मध्ये भारत आणि चीन यांच्यातील युद्धाला जवळपास ६० वर्षे उलटून गेली आहेत.
  • भारतासोबतचे संबंध सुधारण्याऐवजी चीन सातत्याने तणाव वाढवत आहे.
  • भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात सैनिकांसाठी गावे वसवण्याबरोबरच चीनने रसद आणि शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी रेल्वे मार्ग आणि रस्तेही बांधले आहेत.
  • त्यांनी तिबेटमध्ये आपली लष्करी व्यवस्था मोठ्या प्रमाणात मजबूत केली आहे.
  • ते अरुणाचल प्रदेशसह ईशान्येकडील राज्यांमध्ये गुप्तपणे आपले सैन्य तैनात करत आहे.
  • चीनने तिबेटमध्ये आपल्या सैन्याच्या तीन डझन तुकड्या आठ तुकड्यांमध्ये तैनात केल्याचंही समोर आलं आहे.
  • लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांसाठी मोठ्या प्रमाणात तळ तयार करण्यात आले आहेत.
  • त्या सर्व तळांवर लष्कराच्या सर्व गरजांसाठी लॉजिस्टिक क्षमता स्थापित करण्यात आली आहे.

आफ्रिकेतून भारतावर हल्ला करण्याची तयारी सज्ज!

  • चीन लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्या सैन्याची घुसखोरी करत आहे.
  • हिंदी महासागरातही चीन युद्धनौका तैनात करत आहे.
  • भारताला घेरण्यासाठी चीनने आफ्रिकेत तळ बनवलं आहे.
  • हिंद महासागरात आपला तळ बनवल्याची बातमी आहे.
  • यात पाकिस्तान चीनला साथ देत आहे.
  • चीनने पहिला विदेशी नौदल तळ जिबूती अशा प्रकारे तयार केला आहे की तो कधीही अति-विध्वंसक युद्धनौका तैनात करू शकतो.
  • चीनच्या घातक पाणबुड्याही हिंदी महासागरात फेऱ्या मारत आहेत.

Tags: Chinese President Xi JinpingIndia-China Bilateral Relationsचीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगभारत-चीन द्विपक्षीय संबंधसीमावाद
Previous Post

शाईफेकीला समर्थन हेच राष्ट्रवादीचे मुख्य धोरण आहे का?

Next Post

UNDP Reportचा हवाला देत मोदी सरकारचा दावा: २००५पासून २०२१पर्यंत भारतात ४१ कोटी ५० लाख दारिद्र्यमुक्त!

Next Post
Union Minister Rao Indrajit Singh

UNDP Reportचा हवाला देत मोदी सरकारचा दावा: २००५पासून २०२१पर्यंत भारतात ४१ कोटी ५० लाख दारिद्र्यमुक्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!