मुक्तपीठ टीम
जिथं सर्वसामान्य बाह्य जगातील कटकटींपासून मुक्ती मिळवण्यासाठी जातात त्या धार्मिक स्थानांमध्येही काही कमी कटकटी नसतात. नाशिकमध्ये घडलेली एक घटना धार्मिक स्थानांमधील सत्ताकारण दाखवणारी आहे. तेथे एका चर्चमधील फादरने रेव्हरंडसमोर पेटवून घेतले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी पार्थनेच्यावेळी घडलेल्या या धक्कादायक प्रकारामागे वरिष्ठांकडून होत असलेला जाच हे कारण असल्याचे कळते.
चर्च, धर्म आणि जाच!
- नाशिकमध्ये सेंट थॉमस चर्च आहे.
- या चर्चचे व्यवस्थापन पाहणाऱ्या समितीत अनेक विषयांवर वाद आहेत.
- या समितीने चर्चमधील फादर अनंत आपटे यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता.
- समितीच्या आरोपांबद्दलची त्यांची बाजूही ऐकून घेतली गेली नाही.
- त्यामुळे फादर आपटे हे गेले काही दिवस मानसिक तणावात वावरत होते.
- रविवारीही त्यांनी रेव्हरंड शरद गायकवाड यांच्यासमोर बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
- त्यांचे ऐकण्यास नकार दिला गेल्याने त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
- सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
- आपले न ऐकता आरोप करणे हा आपला जाच असल्याचे फादर आपटे यांचे म्हणणे आहे.
आत्मदहनात जखमी झालेले फादर आपटे काय म्हणतात?
- चर्चच्या समितीकडून माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे.
- गेली दोन वर्षे मला त्रास देण्यात येत आहे.
- सेंट थॉमस चर्चची समिती आणि डॉ. मोरे यांनी माझ्यावर खोटे आरोप केले.
- माझ्यावर दडपण आणून माझा मानसिक छळ केला जात आहे.
- रेव्हरंड शरद गायकवाड यांनी माझी बाजू न ऐकताच कारवाई केली.
- माझ्या कामाला स्थगिती दिली. त्यांनी चुकीच्या लोकांचे ऐकले.
- याबद्दल मी रेव्हरंड शरद गायकवाड यांना वेळोवेळी तक्रार केली.
- आज ते चर्चमध्ये आलेले असतानाही त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही.
- अखेर मी जाळून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला.
धार्मिक स्थळ असल्याने कारवाई होणार की दाबले जाणार?
- फादर आपटेंनी आत्मदहनाचा प्रयत्न केला ते स्थान धार्मिक स्थळ आहे.
- चर्चमध्ये घटना घडली असल्याने पोलीस योग्य तपास करून संबंधितांवर कारवाई करणार की काय, त्याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
- पोलिसांनी फादर आपटेंच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चर्चमधील संबंधितांची चौकशी करून योग्य कारवाई करणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- अनेकदा अशा ठिकाणी, अशा प्रभावशाली संस्थांमध्ये घडलेल्या घटनांचा तपास पूर्ण न होता, त्या घटना तशाच दाबल्या जातात, याप्रकरणीही तसेच होण्याची भीती व्यक्त होत आहे.