Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लता मंगेशकरांच्या ‘क्रिकेट’ उपवासाची गोष्ट…उपवास पावला, भारत जिंकला!

February 7, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Lata Mangeshkar

मुक्तपीठ टीम

सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी पुढे येत आहेत. पण संगीत विश्वातील या गानसम्राज्ञा क्रिकेटप्रेमासाठीही ओळखल्या जात असत. त्यांनी एकदा तर भारताने क्रिकेट सामना जिंकावा यासाठी चक्क उपवासही केला होता. तो सामना पाकिस्तानविरोधात होता आणि भारतानं जिंकला तेव्हाच दीदींनी उपवास सोडला होता.

 

पाकिस्तानविरुद्धच्या २०११ च्या विश्वचषकात सामन्यापूर्वी लतादीदींनी केला होता उपवास

  • लता मंगेशकर यांनी २०११ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याबाबत भारतीय क्रिकेट संघासाठी उपवासही केला होता. ही माहिती फार कमी लोकांना माहीत असेल.
  • भारताने पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केल्याने त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली.
  • त्या सामन्यात लतादीदींचा आवडता क्रिकेटर सचिन तेंडुलकरने ८५ धावांची शानदार खेळी खेळली होती.
  • मोहाली येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने नऊ विकेट्सच्या मोबदल्यात २६० धावा केल्या आणि त्यानंतर एक बॉल शिल्लक असताना पाकिस्तानचा संघ २३१ धावांत गुंडाळला गेला. भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतरच लता दीदींनी उपवास सोडला.

 

त्या सामन्यानंतर लता मंगेशकर म्हणाल्या, “मी संपूर्ण सामना पाहिला आणि मी खूप तणावात होते. जेव्हा भारत खेळत असतो तेव्हा माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे गोष्टी करतो. सामन्यादरम्यान मी, मीना आणि उषा यांनी काहीही खाल्ले नाही.”

 

सचिनला मानायच्या मुलगा!

स्वरांच्या देवता लता मंगेशकर या क्रिकेटच्या देवाला आपला मुलगा मानत असत. त्या सचिन तेंडुलकरला मुलासारखं प्रेम करत आणि सचिनही त्यांना आई म्हणत असे. योगायोगाची गोष्ट म्हणजे सरस्वती पूजेच्या दुसऱ्याच दिवशी भारताची देवी सरस्वती गेली होती.

 

सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर यांसारख्या मुंबईतील अनेक नामवंत क्रिकेटपटूंनीही लताजींना नेहमीच आदर दिला. त्यांना क्रिकेटची चांगली समज होती आणि ती क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये राजसिंह डुंगरपूर आणि माजी कसोटीपटू हनुमंत सिंग यांच्याशी क्रिकेटच्या समस्यांवर चर्चा करत असे.


Tags: Cricketlata didilata mangeshkarmuktpeethक्रिकेटमुक्तपीठलता मंगेशकरलतादीदी
Previous Post

तुळशीदास भोईटे सरळस्पष्ट चर्चा: लता मंगेशकर अंत्यदर्शन, शाहरुख खान: विकृत अफवा आणि दुआचं वास्तव!

Next Post

जगात नवं युद्ध पेटणार? रशियाची युक्रेनवर हल्ल्याची जय्यत तयारी, अमेरिकेचा दावा

Next Post
yukren

जगात नवं युद्ध पेटणार? रशियाची युक्रेनवर हल्ल्याची जय्यत तयारी, अमेरिकेचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!