मुक्तपीठ टीम
सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी पुढे येत आहेत. पण संगीत विश्वातील या गानसम्राज्ञा क्रिकेटप्रेमासाठीही ओळखल्या जात असत. त्यांनी एकदा तर भारताने क्रिकेट सामना जिंकावा यासाठी चक्क उपवासही केला होता. तो सामना पाकिस्तानविरोधात होता आणि भारतानं जिंकला तेव्हाच दीदींनी उपवास सोडला होता.
पाकिस्तानविरुद्धच्या २०११ च्या विश्वचषकात सामन्यापूर्वी लतादीदींनी केला होता उपवास
- लता मंगेशकर यांनी २०११ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याबाबत भारतीय क्रिकेट संघासाठी उपवासही केला होता. ही माहिती फार कमी लोकांना माहीत असेल.
- भारताने पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केल्याने त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली.
- त्या सामन्यात लतादीदींचा आवडता क्रिकेटर सचिन तेंडुलकरने ८५ धावांची शानदार खेळी खेळली होती.
- मोहाली येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने नऊ विकेट्सच्या मोबदल्यात २६० धावा केल्या आणि त्यानंतर एक बॉल शिल्लक असताना पाकिस्तानचा संघ २३१ धावांत गुंडाळला गेला. भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतरच लता दीदींनी उपवास सोडला.
त्या सामन्यानंतर लता मंगेशकर म्हणाल्या, “मी संपूर्ण सामना पाहिला आणि मी खूप तणावात होते. जेव्हा भारत खेळत असतो तेव्हा माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे गोष्टी करतो. सामन्यादरम्यान मी, मीना आणि उषा यांनी काहीही खाल्ले नाही.”
सचिनला मानायच्या मुलगा!
स्वरांच्या देवता लता मंगेशकर या क्रिकेटच्या देवाला आपला मुलगा मानत असत. त्या सचिन तेंडुलकरला मुलासारखं प्रेम करत आणि सचिनही त्यांना आई म्हणत असे. योगायोगाची गोष्ट म्हणजे सरस्वती पूजेच्या दुसऱ्याच दिवशी भारताची देवी सरस्वती गेली होती.
सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर यांसारख्या मुंबईतील अनेक नामवंत क्रिकेटपटूंनीही लताजींना नेहमीच आदर दिला. त्यांना क्रिकेटची चांगली समज होती आणि ती क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये राजसिंह डुंगरपूर आणि माजी कसोटीपटू हनुमंत सिंग यांच्याशी क्रिकेटच्या समस्यांवर चर्चा करत असे.