Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिकमध्ये आता द्राक्ष दर पडणार नाहीत! ठरवलेल्या दरानंच शेतकरी विकणार द्राक्ष!

सरकारला जमलं नाही, ते शेतकऱ्यांनी करुन दाखवलं! द्राक्ष बागायतदारांचा दर निश्चितीचा ऐतिहासिक निर्णय

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Farmers to sell grapes at fixed rates!

मुक्तपीठ टीम

नाशिकमध्ये द्राक्षांच्या दराबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी राष्ट्रीय शेतकरी दिनी शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं आहे. द्रात्र उत्पादक नाशिककर शेतकऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे, हे विशेष! आता नाशिकमध्ये ठरवलेल्या दरानंच शेतकरी द्राक्ष विकणार आहेत. द्राक्षाचे दर हे द्राक्ष बागायतदार संघाने ठरवले आहेत. म्हणजेच उत्पादन खर्चावर आधारित किमान १० टक्के नफा पकडून हे दर ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार जानेवारी महिन्यात प्रतिकिलो ८२ रुपये, फेब्रुवारी महिन्यात ७१ तर मार्चमध्ये ६२ रुपये हा कमीत कमी दर करण्यात आला आहे.

 

सरकारला जमलं नाही, ते शेतकऱ्यांनी करुन दाखवलं!

  • गेल्या काही दिवसांमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले नुकसान आणि सरकारची बदलती भूमिका यामुळे सर्वच द्राक्ष उत्पादित शेतकऱ्यांना याचा फटका बसत होता.
  • गेल्या १५ दिवसांपासून दर निश्चितीची प्रक्रिया ही सुरु होती.
  • अनेक बैठका पार पडल्यानंतर महिन्याच्या फरकाने दर कसे राहतील यावर एकमत झाले आहे.
  • एवढेच नाही तर कुणीही ठरलेल्या दरापेक्षा कमीने विक्री करायची नाही असा ठरावच घेण्यात आला आहे.
  • बागायदार संघटनांनी हा ठराव मांडताच शेतकऱ्यांनी याला सहमती दर्शवली व ठराव मंजूर होताच एकट जल्लोष करण्यात आला.

 

राष्ट्रीय शेतकरी दिवशी शेतकऱ्यांचे

  • राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ६१ वर्धापन दिन व राष्ट्रीय शेतकरी दिवसाचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • पिंपळगाव बसवंतमधील सभागृहात हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • शासनाच्या दुर्लक्षामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
  • निर्यात द्राक्षावर लावण्यात येणारी जीएसटी तसेच विविध कर कमी करण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती.
  • मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते.
  • शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
  • या सर्व बाबींचा सरकारला विसरच पडत होता.
  • त्यामुळे नुकसान होऊनही कमी दराने द्राक्ष विक्रीची नामुष्की होती.
  • त्यामुळे बागायतदार संघाने हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

Previous Post

जळगावचे शास्त्रज्ञ अतुल राणे चालवणार मिसाइल मॅन अब्दुल कलामांचा वारसा…

Next Post

आता दोन वर्षांपर्यंत मोबाइल कॉल रेकॉर्ड्सचा डेटा राखला जाणार! सरकारचा मोबाइल कंपन्यांना नवा आदेश!

Next Post
department of telecommunicatio

आता दोन वर्षांपर्यंत मोबाइल कॉल रेकॉर्ड्सचा डेटा राखला जाणार! सरकारचा मोबाइल कंपन्यांना नवा आदेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!