मुक्तपीठ टीम
कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी स्वत:च्या घराच्यांचं नीट पोट भरू शकत नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. आता शेतकरी आणि त्यांचे कुटुंबिय नैराश्यात जात असून फार टोकाचं पाऊल उचलत आहेत. अमरावतीत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याच्या एका अल्पवयीन मुलीने घरच्या गरिबीला कंटाळून आणि शिक्षणासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांमागोमाग आता त्यांचे कुटुंबीयही मृत्यूला कवटाळू लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनाही माणसांसारखं सन्मानानं जगायला मिळून त्यांच्या आत्महत्यांचं दुष्टचक्र कधी थांबणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
- अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छीदवाडी गावात धक्कादायक घटना समोर आली आहे.
- घरच्या गरिबीला कंटाळून आणि शिक्षणासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याच्या १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
- मृतक मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी सोसाईड नोट लिहिली आहे.
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?
- “मी आत्महत्या करणार आहे.
- माझ्या घरची परिस्थिती खूप गरिबीची आहे.
- माझ्या घरामध्ये आम्ही सहा जण आहोत.
- माझी आई कामाला जाते.
- आमच्यावर खूप कर्ज आहे.
- आम्हाला राहण्यासाठी जागा थोडीशी आहे.
- माझा भाऊ लहान आहे.
- माझी आई कर्ज काढून आम्हाला शिकवते.
- माझ्या शेतामध्ये तीन वर्षे झाली उत्पन्न खूप कमी झाले.
- माझे बाबा खूप काबाडकष्ट करतात.
- आम्हाला शाळेत पाठवतात.
- मी कॉलेजमध्ये आहे.
- मी इयत्ता बारावीमध्ये आहे.
- मला शाळेत प्रवेश घेण्यासाठी पैसे नाही.
- मी खूप दिवसांपासून डिप्रेशनमध्ये आहे.
- माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे.
- त्यामुळे मी स्वतःहून आत्महत्या करतेय
म्हणून मी जीव संपवतेय
- “माझे आई-बाबा माझ्यावर प्रेम करतात.
- मी पण माझ्या आई-बाबांवर खूप प्रेम करते.
- मला शाळेमध्ये काही विषय समजत नाही.
- आम्हाला शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म नाही.
- आमची लहान पोर आहे म्हणून मी आत्महत्या करते.
- माझी बहीण कामाला जाते.
- तिने माझ्यासाठी शाळा सोडली.
- ही गोष्ट माझ्या मनात खूप घर करुन बसली आहे. माझी आई दररोज कामाला जाते.
- माझी आई खूप कष्ट करते.
- मला माझ्या नानीची खूप आठवण येते.
- लहानपणापासून त्यांच्यापाशी होते.
- अजून नापास होण्याच्या टेन्शन आहे म्हणून मी जीव संपवतेय.