Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिडकोची मेट्रो लवकरच नवी मुंबईत धावणार!

मेट्रो मार्ग क्र. १ करीता आरडीएसओकडून वेगाचे अंतरिम प्रमाणपत्र प्रदान, प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या दिशेने गाठला मोठा टप्पा

October 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
CIDCO

मुक्तपीठ टीम

सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. १ करीता रिसर्च डिझाईन ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनकडून (आरडीएसओ) वेगाचे अंतरिम प्रमाणपत्र २० ऑक्टोबर २०२१ रोजी देण्यात आले. मेट्रोचे कमाल वेगाने परिचालन करण्याची मंजुरी या प्रमाणपत्राद्वारे देण्यात आली आहे. यामुळे लवकरच या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी म्हणाले की, “मेट्रो मार्ग क्र. १ वर घेण्यात येणारी ऑसिलेशन चाचणी यशस्वी ठरली असून, आरडीएसओकडून या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोचे कमाल वेगाने परिचालन करण्या संदर्भातील अंतरिम प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दिशेने मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. आता प्रवासी वाहतूक कार्यान्वित करण्यासाठी सीसीआरएस मंजूरीची प्रतिक्षा आहे.”

 

अकरा किमी धावणार नवी मुंबईतील पहिली मेट्रो

  • सिडकोकडून नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग साकारण्यात येत आहेत.
  • यातील बेलापूर ते पेंधर हा मार्ग क्र. १ एकूण ११ कि.मी. लांबीचा असून या मार्गावर तळोजा येथे मेट्रोचे आगार आहे.
  • भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत असणाऱ्या आरडीएसओ यांच्याकडून देशातील विविध रेल्वे प्रणालींमध्ये प्रमाणीकरण आणि समन्वय साधण्याची जबाबदारी असते.
  • आरडीएसओ यांच्याकडून सदर मार्ग क्र. १ वरील पेंधर स्थानक ते सेंट्रल पार्क स्थानका दरम्यानच्या ५.१४ कि.मी. च्या अंतरावर मेट्रोची ऑसिलेशन चाचणी आणि इनर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी २८ ऑगस्ट २०२१ पासून घेण्यास सुरुवात झाली.
  • प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी म्हणून ऑसिलेशन चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरते.

 

या दरम्यान वेगवेगळ्या वजनाचा भार वाहून नेण्याची मेट्रोची क्षमता आणि इमर्जन्सी ब्रेक यांची चाचणी घेण्यात आली. तसेच सिडकोकडून रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, विद्युत पुरवठा, मार्गिका इ. मेट्रोतील प्रणालींशी संबंधित कागदपत्रे, चाचणी प्रमाणपत्रे आरडीएसओला सादर करण्यात येऊन, कागदपत्रांची आरडीएसओकडून पडताळणी करण्यात आली. ऑसिलेशन चाचणी यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर मार्ग क्र. १ वर कमाल वेगाने मेट्रोचे परिचालन करण्याकरिता आरडीएसओकडून वेगाचे अंतरिम प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यानंतर लवकरच आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून परीक्षण करण्यात येईल व तद्नंतर रेल्वे मंडळाची मंजुरी प्राप्त करून मार्ग क्र.१ वर पेंधर ते सेंट्रल पार्क स्थानकांदरम्यान प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला सुरुवात होईल.

 

 

 


Tags: CIDCOMetroRDSOआरडीएसओडॉ. संजय मुखर्जीनवी मुंबई मेट्रो प्रकल्परेल्वे मंत्रालयसिडकोसीएमआरएस
Previous Post

“व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करावा”: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Next Post

घरची गरिबी…शिक्षणासाठी पैसे नाहीत! शेतकरी कन्येची आत्महत्या!! कधी थांबणार हे दुष्टचक्र?

Next Post
Farmer's daughter suicide

घरची गरिबी...शिक्षणासाठी पैसे नाहीत! शेतकरी कन्येची आत्महत्या!! कधी थांबणार हे दुष्टचक्र?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!