Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी आंदोलन सुरुच राहणार! एमएसपीसह लखिमपूर शेतकरी हत्याकांडातील मंत्री मिश्राच्या हकालपट्टीची मागणी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
farmers agitation will be continued

मुक्तपीठ टीम

शेतकरी आंदोलन यापुढेही सुरुच राहणार आहे. किसान आंदोलन संयुक्त आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीमालासाठीच्या किमान हमीभाव म्हणजेच एमएसपीला कायद्याचे स्वरुप, लखिमपूर शेतकरी हत्याकांडात मुलगा आरोपी असेलेले मंत्री अजय मिश्रा यांच्यावर कारवाई अशा काही मागण्यांसाठी शेतकरी आग्रही आहेत. कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांची माहिती देणारे पत्र लिहिले जाणार आहे.

 

शेतकरी संघटनांच्या बैठकीनंतर माध्यमांना शेतकरी नेते बलबीर राजेवाल यांनी माहिती दिली. संसदेतील कायदा रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. संयुक्त किसान मोर्चाचे सर्व पूर्वनिर्धारित कार्यक्रम वेळेवर पार पडतील. २७ नोव्हेंबरला मोर्चाची पुन्हा बैठक होणार आहे. मोर्चाच्या आजच्या बैठकीत एमएसपीसह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

 

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मोर्चा पंतप्रधान मोदींना खुले पत्र लिहिणार असल्याचे बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले. या पत्रात एमएसपी समिती, वीज बिल २०२०, शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे परत करणे आणि लखमीपूर खेरीसाठी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांची हकालपट्टी या प्रमुख मागण्यांचा समावेश असेल.

 

ते म्हणाले की, तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या पंतप्रधान मोदींच्या घोषणेचे आघाडीने स्वागत केले आहे. मोर्चाच्या नेत्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींचे हे चांगले पाऊल आहे, परंतु शेतकऱ्यांच्या इतर अनेक मागण्या अद्याप प्रलंबित आहेत.

 

शेतकरी आता पुढे काय करणार?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी सुधारणा कायदा मागे घेण्याची घोषणा केल्यानंतरही शेतकरी संघटना निदर्शने करत राहणार आहेत.
  • संयुक्त किसान मोर्चाच्या नऊ सदस्यीय समन्वय समितीने शनिवारी बैठक घेतली आणि आंदोलनासाठी यापूर्वी ठरलेले कार्यक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
  • २२ नोव्हेंबरला लखनऊमध्ये महापंचायत होईल.
  • २६ नोव्हेंबरला आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत असल्यानं सर्वच आघाड्यांवर गर्दी वाढवण्यात येणार आहे.
  • २९ नोव्हेंबरला संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यावर संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Tags: Ajay mishraFarm lawFarmer Protest DelhilakhimpurMSPअजय मिश्राएमएसपीकृषी कायदेपंतप्रधान नरेंद्र मोदीलखिमपूर शेतकरी हत्याकांडशेतकरी आंदोलन
Previous Post

केंद्र सरकार विकतेय ९७० कोटींची मालमत्ता…BSNL, MTNLच्या मुंबईसह देशातील मालमत्तांची यादी प्रकाशित!

Next Post

मुंबईच्या नौदल गोदीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस विशाखापट्टणम विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश

Next Post
vishakapattanam

मुंबईच्या नौदल गोदीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस विशाखापट्टणम विनाशिकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!