Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्र सरकार विकतेय ९७० कोटींची मालमत्ता…BSNL, MTNLच्या मुंबईसह देशातील मालमत्तांची यादी प्रकाशित!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
MTNL And BSNL

मुक्तपीठ टीम

केंद्रातील मोदी सरकारने पैसे जमा करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील BSNL, MTNL या दोन टेलिकॉम कंपन्यांच्या मालमत्ता विकण्याचे ठरवले आहे. या कंपन्यांच्या ९७० कोटींच्या मालमत्तांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM)च्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या कागदपत्रांनुसार, ९७० कोटी रुपयांच्या राखीव किंमतीवर या मालमत्ता विक्रीसाठी काढल्या आहेत. यात मुंबईच्या गोरेगावमधील मालमत्ताही आहे.

 

कोणत्या मालमत्ता विकणार?

हैदराबाद, चंदीगड, भावनगर आणि कोलकाता येथे असलेल्या BSNL मालमत्ता सुमारे ६६० कोटी तर MTNL च्या वसारी हिल, गोरेगाव, मुंबई येथे असलेल्या मालमत्ता ३१० कोटी रुपयांच्या राखीव किमतीत विक्रीसाठी DIPAM वेबसाइटवर सूचीबद्ध केल्या आहेत.

 

एक ते दीड महिन्यात विकणार!

बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी के पुरवार यांनी एका निवेदनात स्पष्ट केले की, “एमटीएनएल आणि बीएसएनएलमधील मालमत्तेतून पैसा उभा करण्याचा हा पहिला टप्पा आहे. बीएसएनएलच्या ६६० कोटी आणि एमटीएनएलच्या ३१० कोटींच्या मालमत्तेसाठी बोली मागविण्यात आल्या होत्या. आम्ही योजना आखत आहोत. एक ते दीड महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू.”

 

सरकारी टेलिकॉम कंपन्यांचे पुनरुज्जीवन करणार!

  • मालमत्ता विकून पैसा उभा करणे हा MTNL आणि BSNL साठी ६९,००० कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन योजनेचा एक भाग आहे.
  • यासाठी सरकारने ऑक्टोबर २०१९ मध्ये मान्यता दिली होती.
  • याशिवाय, MTNL मालमत्तेचा ई-लिलाव १४ डिसेंबर रोजी होणार आहे.
  • ह्यामध्ये MTNL चे २० फ्लॅट्स देखील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
  • या फ्लॅटची किंमत ५२.२६ लाख ते १.५९ कोटी रुपये आहे.
  • २०२२ पर्यंत या दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तेतुन ३७,५०० कोटी रुपयांपर्यंत कमाई करण्याची योजना आहे.

 

सरकार आणखी सहा सार्वजनिक कंपन्यांमधील हिस्सेदारी सोडणार!

  • बीएसएनएल आणि एमटीएनएल रिअल इस्टेट मालमत्तेचा लिलाव करत असल्याने, सरकार या वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत सहा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील हिस्सा कमी करेल.
  • या सहा कंपन्यांच्या नावांमध्ये बीपीसीएल, बीईएमएल, शिपिंग कॉर्पोरेशन, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि निलांचल इस्पात यांचा समावेश आहे.
  • त्यापैकी बीपीसीएलच्या खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.
  • बीईएमएल, शिपिंग कॉर्पोरेशन, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि निलांचल इस्पात यांचीही बोली प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होऊ शकते.

Tags: BEMLBPCLBSNLCentral Electroniccentral GovernmentE-auctionMTNLNilanchal IspatPawan HansShipping Corporationtelecom companyई-लिलावएमटीएनएलकेंद्र सरकारटेलिकॉम कंपनीनिलांचल इस्पातपवन हंसबीईएमएलबीएसएनएलबीपीसीएलशिपिंग कॉर्पोरेशनसेंट्रल इलेक्ट्रॉनिक
Previous Post

किरीट सोमय्यांचं नवं लक्ष्य…सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील! जालना घोटाळ्यात पत्नी, सासऱ्यांचं नाव घेतलं!

Next Post

शेतकरी आंदोलन सुरुच राहणार! एमएसपीसह लखिमपूर शेतकरी हत्याकांडातील मंत्री मिश्राच्या हकालपट्टीची मागणी!

Next Post
farmers agitation will be continued

शेतकरी आंदोलन सुरुच राहणार! एमएसपीसह लखिमपूर शेतकरी हत्याकांडातील मंत्री मिश्राच्या हकालपट्टीची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!