Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तिरंग्यासह ‘जन-गण’ रस्त्यावर! दिल्लीत लाखो शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर संचलन!

शिस्त पाळण्यासाठी शेतकरी स्वयंसेवक, सुव्यवस्थेसाठी पोलीस सज्ज!

January 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
Farmer tractors parade -9

मुक्तपीठ टीम

 

आजचा प्रजासत्ताक दिन वेगळा ठरणारा आहे. ऐतिहासिक आहे. देशाची राजधानी दिल्लीत नेहमीच्या प्रजासत्ताक संचलनानंतर आज शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर संचलन आहे. आपल्या संघटनांचे, पंथाचे झेंडे आणि त्याचबरोबर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवत शेतकरी ट्रॅक्टर संचलनात भाग घेतील. लाखोंच्या संख्येने ट्रॅक्टर संचलनात सहभागी असणार आहेत.

शेतकऱ्यांना मदत लागली तर आणि त्यांनी शिस्त पाळावी यासाठी किसान स्वयंसेवक संपूर्ण संचलनाच्या मार्गावर सज्ज असतील. अर्थात दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा पथकेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. लाखो ट्रॅक्टर टिकरी, सिंघु आणि गाजीपूर सीमेवर पोहोचले होते. आज जवळजवळ दहा लाख ट्रॅक्टर येथे उपस्थित आहेत.

 

ट्रॅक्टर संचलनासाठी परवानगी मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवरून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची एक बाजू मोकळी केली आहे. आंदोलन सुरू असलेल्या जागेवरून जवळजवळ एक किलोमीटर पुढे सिमेंटचे बॅरिकेड्स आणि लोखंडाचे मोठे कंटेनर काढून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. त्यासोबतच दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनीही नियोजित मार्गावर बंदोबस्त वाढवला आहे. संचलनामध्ये सर्वाधिक ट्रॅक्टर टिकरी सीमेवर आले आहेत. त्यामुळे तेथे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

 

शिस्तीसाठी नेत्यांवर जबाबदारी

संचलनादरम्यान कोणीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये, याची हमी शेतकरी नेत्यांकडून घेण्यात आली आहे. संचलना दरम्यान काही गोंधळ झाल्यास ज्येष्ठ शेतकरी नेते यांना जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

 

ट्रॅक्टर संचलनासाठी अटी-शर्ती

  • दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना अट घातली आहे की, ट्रॅक्टरवर तीनपेक्षा जास्त लोक बसणार नाहीत.
  • संचलनामध्ये टिकरी ते दिल्ली या मार्गावर ट्रॅक्टर संचलना दरम्यान सुरक्षा दल आणि शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही परवानगी नसणार
  • २५ जानेवारी संध्याकाळपासूनच मार्गावरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत

 

ट्रॅक्टर संचलनात सुविधा-शिस्तीसाठी हजार शेतकरी स्वयंसेवक

  • ट्रॅक्टर संचलनासाठी एक हजार स्वयंसेवकही तैनात केले गेले आहेत. त्यांची यादी पोलिसांनाही देण्यात आली आहे
  • स्वयंसेवक ठरलेल्या गणवेशात असतील
  • स्वयंसेवकांमध्ये प्रथमोपचार, पाणी आणि चहा पुरवणाऱ्यांशिवाय ट्रॅक्टर मेकॅनिकही आहेत
  • त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे

 

ट्रॅक्टर संचलनाचा मार्ग

  • ट्रॅक्टर संचलनाचा मार्ग टिकरी बॉर्डरपासून ६३ ते ६४ किमी
  • सिंहू बॉर्डरपासून ६२ ते ६३ किमी आणि गाझीपूर बॉर्डरपासून ४६ किमी एवढा ठरविण्यात आला आहे.
  • केवळ सिंहू, टिकरी आणि गाझीपूरच्या सीमेवरूनच दिल्लीत शेतकरी आंदोलक प्रवेश करू शकतील.
  • तसेच पलवल आणि शाहजहांपूर सीमेवर बसलेल्या शेतकर्‍यांना त्या मार्गाने दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही.

 

शेतकरी संघटना, खालसा पंथ आणि तिरंगा झेंडा

Farmer Tractors parade -6

संचलनामध्ये सहभागी झालेल्या ट्रॅक्टरवर तीन प्रकारचे झेंडे फडकत आहेत. यात शेतकरी संघटना, राष्ट्रीय ध्वज आणि खालसा पंथाचा ध्वज समाविष्ट आहे. संयुक्त किसान मोर्चाने एखादी संस्था आपल्या ट्रॅक्टरवर तिरंगा लावणार असल्यास कोणाकडूनही तिरंग्याचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही केले गेले आहे.


Tags: Farmer Delhi Protestfarmer tractor marchtractor paradeशेतकरी आंदोलनशेतकरी ट्रॅक्टर संचलन
Previous Post

‘विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्‍थापना त्‍वरित करा’

Next Post

महाराष्ट्रातील पाच मुलांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड

Next Post
balapuraskar

महाराष्ट्रातील पाच मुलांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!