Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्‍थापना त्‍वरित करा’

सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

January 26, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
सुधीर मुनगंटीवार

३० एप्रिल २०२० रोजी विदर्भ वैधानिक विकास मंडळाची मुदत संपलेली आहे. विदर्भाच्‍या सर्वांगिण विकासाच्‍या दृष्‍टीने या विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्‍थापना करण्‍याची आवश्‍यकता आहे. विकास खर्चाचे समान वाटप व साधनसपत्‍तीचे न्‍याय्य वाटप तसेच विदर्भाचा समतोल विकास साधण्‍याच्‍या दृष्‍टीने या विदर्भ वैधानिक विकास मंडळाची नितांत आवश्‍यकता आहे, परंतु दुर्देवाने मुदत संपल्‍यानंतरही मंडळाची स्‍थापना न झाल्‍याने विदर्भाचा अनुशेष वाढण्‍याची व विकास खुटण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्‍यामुळे विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्‍थापना त्‍वरीत करण्‍यात यावी, अशी मागणी माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकीत केली.

 

२५ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या नियोजन भवनात जिल्‍हा नियोजन समितीची बैठक संपन्‍न झाली. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक हिताच्‍या महत्‍वपूर्ण विषयांच्‍या अनुषंगाने ठराव बैठकीत मांडले.

 

यात प्रामुख्‍याने चंद्रपूर जिल्‍हा नियोजन विकास समितीला २०१६-१७ मध्‍ये २२७.३८ कोटी, २०१७-१८ मध्‍ये २६१.५८ कोटी, २०१८-१९ मध्‍ये ३००.५६ कोटी, २०१९-२० मध्‍ये ३७५ कोटी तर २०२०-२०२१ मध्‍ये हा निधी कमी होवून २४८.६० कोटी तर २०२१-२२ मध्‍ये १८०.७५ कोटी रू. इतका निधी देण्‍यात येत आहे. निधीमध्‍ये झालेली घट ही चंद्रपूर जिलहयाच्‍या विकासासाठी मारक आहे. हा निधी वाढविण्‍याची आवश्‍यकता आहे. चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासाच्‍या दृष्‍टीने या निधीत वाढ करण्‍याची मागणी त्‍यांनी यावेळी केली.

 

लॉकडाऊनच्‍या काळात सर्वसामान्‍य गरीब नागरिकांना मोठया व अवाजवी रकमेची बिले देण्‍यात आली आहेत. त्‍यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेले गरीब नागरिक यामुळे आणखी अडचणीत सापडले आहेत. विज बिलात सर्वसामान्‍य जनतेला सूट देण्‍यात यावी ही मागणी सर्वच स्‍तरातून होत आहे. जनतेमध्‍ये असंतोष आहे. विज बिलात सर्वसामान्‍य जनतेला सूट देण्‍यात यावी अशी मागणी यावेळी मुनगंटीवार यांनी केली.

 

रमाई आवास योजनेचा निधी शासनाकडून अप्राप्‍त असल्‍याने या योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून या योजनेचा निधी तातडीने मिळावा यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी शासनाकडे सातत्‍याने मागणी केली आहे. मात्र अद्याप निधी अप्राप्‍त आहे. चंद्रपूर जिल्‍हयासाठी रमाई आवास योजनेचा निधी तातडीने प्रदान करण्‍यात यावा याबाबतचा ठरावही त्‍यांनी बैठकीत मांडला.


Tags: BJPsudhir mungantiwarभाजपविदर्भ वैधानिक विकास मंडळसुधीर मुनगंटीवार
Previous Post

भाजपकडून पद्मपुरस्कार मानकऱ्यांचे अभिनंदन

Next Post

तिरंग्यासह ‘जन-गण’ रस्त्यावर! दिल्लीत लाखो शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर संचलन!

Next Post
Farmer tractors parade -9

तिरंग्यासह 'जन-गण' रस्त्यावर! दिल्लीत लाखो शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर संचलन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!