मुक्तपीठ टीम
केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाचा आज वा दिवस आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या आणखी एका शेतकऱ्याने प्राण गमावले आहेत. या शेतकऱ्याचा मृत्यू टिकरी सीमेवरील आंदोलनस्थळी झाला आहे. तिथे आतापर्यंत १५ शेतकऱ्यांचे मृत्यू ओढवले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नेमलेल्या समितीशी चर्चा करण्यास शेतकरी तयार नाहीत, तसेच समितीतील एका सदस्याने राजीनामा दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
शेतकऱ्यांचे मृत्यूसत्र
शेतकरी दिल्ली सीमांवर आंदोलन करत आहे. काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना तृर्तास स्थगिती दिली आहे. पण केंद्र सरकारने कायदे मागे न घेतल्यान आंदोलन सुरूच आहे. आंदोलना दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी अनेक आपले जीवन संपवले. तर आता या आंदोलनाचा आणखी एक बळी गेला आहे.
या सीमेवर आतापर्यंत एकूण १५ शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक शेतकऱ्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे. थंडी असूनही येथे मोठ्या संख्येने शेतकरी ठिय्या मांडून बसले आहेत. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांचे मृत्यू होत आहेत. पण सरकारला याचे काहीच पडलेले नाही आहे, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. तसेच कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी कित्तेक दिवस सीमेवर आंदोलन करत आहोत. मात्र, सरकार कायदे मागे घेण्यासाठी पुढाकार घेत नाही आहे.
शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांचेही आंदोलन
सदर आंदोलनाची तीव्रता सरकार पर्यंत पोहचण्यासाठी टिकरी सीमेवर रविवारी सकाळी अनेक महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील विद्यार्थी सीमेवर पोहोचले होते. तिथे त्यांनी सरकारला विरोध दर्शवत लागू केलेले कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच किती नुकसान होईल याची जाणीव करून देणारे पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात अनेक विद्यार्थांनी भाग घेतला होता. तसेच त्या विद्यार्थांनीही आपण किसानांसोबत असल्याचे सांगितले.