Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांचा भारत बंद! दिल्लीसह उत्तरेतील राज्यांमध्ये प्रभाव!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
farmers protest

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चानं ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. सोमवारी सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. या भारत बंदमुळे दिल्ली, उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

 

या बंदला दिल्ली सरकारसह अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. ‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांनी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरयाणात आपलं आंदोलन तीव्र केले आहे. दिल्लीच्या गाझीपूर, शंभू सीमांवर शेतकऱ्यांनी ठाम मांडायला सुरुवात केली आहे. दिल्ली – अमृतसर, दिल्ली – अंबाला यांसहीत अनेक रस्त्यांवर चक्का जाम करण्यात आला आहे.

 

शेतकऱ्यांनी दिल्ली-जम्मू रेल्वे मार्गावरील पठाणकोट रेल्वे कॅन्ट स्टेशनजवळ रेल्वे क्रॉसिंगच्या मध्यभागी ट्रॅक्टर उभे केले आहेत. जम्मू-जालंधर बायपास आणि पंजाब-हिमाचल सीमेवरील दमताल येथे प्रचंड ट्रॉली उभारून राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे.

 

हरियाणाच्या सोनपत येथील गणौर येथील भारतीय आंतरराष्ट्रीय फलोत्पादन बाजारासमोर शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ४४ रोखला आहे. आंतरराष्ट्रीय फलोत्पादन बाजारामध्ये शेतकऱ्यांसाठी लंगरचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर चंदीगडहून दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकण्यात आले आहेत.

 

कृषी कायद्यांच्या विरोधात गाझीपूर सीमेवर निदर्शने केली जात आहेत. संयुक्त किसान मोर्चाने सकाळी ६ ते दुपारी ४ पर्यंत बंदची घोषणा केली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रचंड वाहतूक कोंडी आहे.

 

हरियाणाच्या फतेहगढ येथील शेतकरी रेल्वे स्टेशनवर पोहोचले आहेत आणि रेल्वे ट्रॅकवर उभे राहून विरोध करत आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनावर ‘भारत बंद’मुळे आंदोलकांनी रोहतक, हरियाणामध्ये राज्य महामार्ग रोखला आहे.

 

कृषीमंत्र्यांचे चर्चेसाठी आवाहन

  • २७ सप्टेंबरच्या भारत बंदची शेतकऱ्यांनी पूर्ण तयारी केली आहे.
  • दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
  • तोमर यांनी रविवारी सांगितले की, शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपावर सरकार विचार करण्यास तयार आहे.
  • यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत.
  • यानंतरही, त्यांना जर काही समस्या असेल तर सरकार निश्चितपणे याबद्दल चर्चा करेल.

 

या पक्षांचा पाठिंबा

  • काँग्रेस
  • आरजेडी
  • आम आदमी पार्टी
  • मायावतींचा बहुजन समाज पक्ष
  • समाजवादी पक्ष
  • डाव्या पक्षांनीही भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

Tags: Bharat BandCongressFarmers protestharyanamayawatinarendra tomarnorth indiaआम आदमी पार्टीकृषी कायदेसंयुक्त किसान मोर्चा
Previous Post

प. महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्याकडे वळवणार!

Next Post

“जनतेचे प्रश्न सोडवून पक्ष अधिक मजबूत करा”!

Next Post
chhagan bhulbal

"जनतेचे प्रश्न सोडवून पक्ष अधिक मजबूत करा"!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!